ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. तेलाचा टँकर उलटल्याने १३ भारतीयांसह १६ जणांचा संपूर्ण क्रू समुद्रात बेपत्ता झाला आहे. सोमवारी ही दुर्घटना झाली आणि मंगळवारी याची माहिती मिळाली. या दुर्घटनेत बुडालेल्या भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. माहितीनुसार, १३ भारतीयांसोबतच तीन श्रीलंकन नागरिकांचाही समावेश होता. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे.
ओमानच्या किनारपट्टीलगत एक ऑईल टँकर उलटला. ओमानच्या किनारपट्टीवर बुडालेल्या ऑईल टँकरवर आफ्रिकेच्या कोमोरोस देशाचा झेंडा होता. प्रेस्टिज फाल्कन असे बुडालेल्या ऑईल टँकरचे नाव आहे. ऑईल टँकरमधील १६ क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता आहेत. ऑईल टँकर बुडाल्यानंतर सागरी सुरक्षा केंद्राने (एमएससी) मंगळवारी याची माहिती दिली. कोमोरोस-ध्वज असलेला ऑईल टँकर रास मदारकाच्या आग्नेयेस २५ नॉटिकल मैल दूर असलेल्या बंदर शहराजवळ पलटल्याचे एमएससीने म्हटले आहे.
Updates regarding the recent capsizing incident of the Comoros flagged oil tanker southeast of Ras Madrakah pic.twitter.com/PxVLxlTQGD
— مركز الأمن البحري| MARITIME SECURITY CENTRE (@OMAN_MSC) July 16, 2024
घटना उघडकीस आली तेव्हा जहाज पाण्यात बुडून उलटे झाले होते. जहाजातून तेल किंवा तेल उत्पादने समुद्रात गळती होत आहेत की नाही याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, हे जहाज येमेनच्या दिशेने जात असताना डुक्म बंदराजवळ ते उलटले. शिपिंग डेटानुसार हे जहाज २००७ मध्ये बांधलेले ११७ मीटर लांबीचा तेल वाहून नेणारा टँकर आहे. अशा लहान टँकरचा वापर लहान किनारपट्टीवरील प्रवासासाठी केला जातो.
हे ही वाचा..
मविआचे नेते शिवरायांच्या की, गडावर हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी !
वरळी हिट अँड प्रकरणी मिहीर शाहला १४ दिवसीय न्यायालयीन कोठडी!
पूजा खेडकरांचे प्रशिक्षण थांबवून मसुरीला बोलावले
एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार
डुक्म बंदर हे ओमानच्या नैऋत्य किनाऱ्यावर, प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या जवळ आहे, ज्यामध्ये एक प्रमुख तेल शुद्धीकरण कारखाना आहे जो ओमानचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे या भागात ऑईल टँकरची ये जा सातत्याने सुरू असते.