पेपर, नियतकालिके किंवा इंटरनेटवर अनेकांनी आजवर सुडोकू केव्हा ना केव्हा तरी सोडवली आहेच. संपूर्ण जगामध्ये आजही १० कोटी लोक नियमितपणे ही कोडी सोडवतात. काल याच सुडोकूचे गॉडफादर माकी काजी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. कोडी बनवणारे आणि प्रकाशक म्हणून माकी काजी यांची ओळख होती. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने माकी काजी यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
माकी काजी यांनी जपानी विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडले होते. कोड्याचा पेपर काढण्याआधी त्यांनी एका छपाई कंपनीत नोकरी केली होती. त्यांनी सुडोकूच्या माध्यमातून अंकांची कोडी पहिल्यांदा जगासमोर आणली. सुडोकूचे गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माकी काजी यांना जगभरातील कोडी सोडवणाऱ्यांकडून भरपूर प्रेम मिळाले, असे त्यांची कंपनी निकोलीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?
सुडोकू अतिशय लोकप्रिय कोडी आहेत. ही अंक कोडी सोडवण्यासाठी डोक्याला चालना द्यावी लागते. ९ चौकोनांत ९ छोटे चौकोन तयार करून त्याच्या आधारे या कोड्याची निर्मिती केली जाते.
सुडोकू दोन दशकापूर्वी जापानाबाहेर लोकप्रिय झाला. परदेशी वर्तमानपत्रामध्ये ही कोडी प्रसिद्ध व्हायची, त्यामुळे सुडोकूला जगभरात ओळख मिळाली. माणसाच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी तसेच ती वाढवण्याच्या दृष्टीने सुडोकूकडे पाहिले जाते.