युरोपात कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

युरोपात कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती आटोक्यात येत असतानाच युरोपमध्ये मात्र चिंता वाढू लागली आहे. युरोपात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने युरोपमध्ये कोविडची पुढची लाट येऊ घातली असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने युरोपमध्ये पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोविड रुग्णसंख्येवरून चिंता व्यक्त करताना, जर शिस्त पाळली नाही, तर अशाच प्रकारे नव्या लाटा येत राहतील असा इशारा देखील दिला आहे. गेल्या आठवडा भरात कोविड रुग्णसंख्येत १० टक्क्यांनी वाढ झाली होती. युरोपमध्ये आता बंधने बऱ्यापैकी शिथील करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रवासाला सुरूवात केली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम स्वरूप म्हणून युरोपात रुग्णवाढ झाली असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे युरोप विभागाचे प्रमुख हान्स क्लुग यांनी व्यक्त केले आहे. जर शिस्त पाळली नाही तर युरोपीयन भागात नव्या लाटा येत राहतील असे देखील सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

युरोपात सध्या उन्हाळा असल्याने उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे युरोपभर भ्रमंतीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासोबतच युरोपला डेल्टा प्रकारच्या कोविडची चिंता भेडसावत आहे.

कोविशिल्डसाठी युरोपची दारे खुली

युरोपियन महासंघाने कोविशिल्ड लसीची मान्यता रद्द केली होती. परंतु त्यानंतर नव्या बातमीनुसार युरोपियन महासंघातील ९ देशांनी या लसीला मान्यता दिली आहे. यामध्ये युरोपियन महासंघातील काही प्रमुख देशांचा समावेश देखील आहे. जर्मनी, स्पेन आणि युरोपियन महासंघात नसलेल्या स्वित्झरलॅंड सारख्या देशांनी देखील या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्या लोकांना युरोपमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या अनेक भारतीय प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Exit mobile version