कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत

कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत

देशभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला तर आहेच, परंतु जगात इतरत्र देखील कोविडचा हाहाकार चालूच आहे. आता जगातील सर्वात उंच शिखराच्या बेस कँपपर्यंत देखील कोविडची मजल गेली आहे. एका नॉर्वेजियन गिर्यारोहकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या चाचणीतून निष्पन्न झाले आहे.

जगातील सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी निघालेल्या गिर्यारोहकांपैकी एक नॉर्वेजियन गिर्यारोहकाला कोविडची लागण झाली आहे. एर्लेंड नेस असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. एव्हरेस्टच्या बेस कँपवरून त्याला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काठमांडू येथे आणण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत. या गिर्यारोहकासोबतच एका स्थानिक नेपाळी शेर्पालादेखील कोविडची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘द हिल’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

हे ही वाचा:

‘एका अनिलवर थांबून चालणार नाही’

बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस

पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला

विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर फुप्फुसांमध्ये द्रव निर्माण होण्याची शक्यता असते. सुरूवतीला नेसला तोच त्रास झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. नेस जेव्हा या मोहिमेसाठी नॉर्वेहून निघाला त्यावेळी त्याची कोविड चाचणी निगेटीव्ह आली होती. त्याशिवाय काठमांडूमध्ये १४ दिवस विलगीकरणात देखील त्याला कोविडची कुठलीही लक्षणे देखील आढळली नव्हती.

आपल्यामुळे इतरांना कोविडची लागण झाली नसेल अशी आशा नेस याने व्यक्त केली. नेपाळमधील एव्हरेस्ट दक्षिण बेस कँप ५,३६४ मीटर उंचीवर असल्याने या उंचीवरून हॉस्पिटलच्या सहाय्याने बचाव करणे शक्य असते, परंतु ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीवर त्रास जाणवल्यास हेलिकॉप्टरने देखील बचाव केला जाऊ शकत नाही.

या घटनेमुळे नेपाळच्या पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहिमा खुल्या करण्याच्या धोरणावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षी सर्व एव्हरेस्ट मोहिमा रद्द केल्या होत्या, परंतु यावर्षी काहींनी या मोहिमा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. द हिलच्या वृत्तानुसार नेपाळने एव्हरेस्ट चढाईचे ३७७ परवाने दिले आहेत.

Exit mobile version