कोविडचा वेग मंदावला

कोविडचा वेग मंदावला

भारतात कोविड-१९ संसर्गाचा आलेख स्थिरावला असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. भारतातील १४६ जिल्ह्यात गेल्या सात दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्याबरोबरच १८ जिल्ह्यांत गेल्या चौदा दिवसात, सहा जिल्ह्यात एकविस दिवसात आणि २१ जिल्ह्यात अठ्ठाविस दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

ही माहिती आरोग्यमंत्र्यांनी कोविड-१९साठीच्या मंत्र्यांच्या उच्चस्तरिय समितीच्या बैठकीत बोलताना दिली. ही बैठक व्हिडियो कॉन्फरन्सिन्गद्वारे घेण्यात आली होती. त्यावेळी मंत्र्यांनी गेल्या चोविस तासात केवळ बारा हजार नवीन रुग्ण आढळल्याची माहिती दिली. याबरोबरच बाधित रुग्णांची एकूण संख्या १.७३ लाख झाल्याची माहिती दिली.

डॉ. वर्धन यांनी सांगितले की एकूण बाधित रुग्णांपैकी ०.४६ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर २.२०टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत आणि ३.०२ टक्के रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर ठेवले आहे. यु.केच्या नव्या जातीच्या विषाणूने बाधित रुग्णसंख्या १६५ झाली आहे. हे सर्व रूग्ण देखरेखीखाली असून, त्यांना विलगीकरणात ठेवले आहे.

या सभेत आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आत्तापर्यंतच्या लसीकरणाच्या मोहिमेचा आढावा घेतला. आत्तापर्यंत एकूण ११२.४ लाख कोविड लसीचे डोसेस तीन दिवसात विविध राज्यांत आणि केंद्रशासीत प्रदेशांत वितरीत झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत ९३ लाख ७६ हजार ०३० आरोग्यसेवकांना आणि ५३ लाख ९४ हजार ०९८ आघाडीच्या स्वयंसेवकांनी को-विन ऍपवर नोंदणी केल्याची माहिती त्यांनी दिली.

निती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य असलेल्या व्ही.के.पॉल यांनी लसीकरण व्याप्तीत देशाचा सध्या सहावा क्रमांक आहे आणि याच गतीने लसीकरण चालू राहिल्यास भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल असे सांगितले.

Exit mobile version