जगात कोविडने धुमाकूळ घातलेला असताना, अनेक गरीब आणि अविकसित राष्ट्रांना लस मिळावी यासाठी कोवॅक्स नावाचा उपक्रम जागतिक समुदायाकडून चालू करण्यात आला आहे. कोवॅक्सने जागतिक आरोग्य संघटनेला भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन लसीला लवकरात लवकर परवानगी देऊन कोवॅक्समध्ये समाविष्ट करून घेण्याची सूचना केली आहे.
कोवॅक्सच्या भारतातील आणि अन्य देशांतील तज्ज्ञांनी देखील कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसाठी कोवॅक्सिनला कोवॅक्स उपक्रमात घेण्यासाठी देखील ही महत्त्वाची बाब ठरली आहे. आत्तापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने केवळ युरोप आणि अमेरिकेतील लसींनाच परवानगी दिली आहे.
हे ही वाचा:
लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या
धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार
दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी
अनिल देशमुख, १०० कोटी प्रकरणात, ईडीकडून पाच बारमालकांची चौकशी
कालच झालेल्या बैठकीत परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांनी भारत बायोटेकच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता प्राप्त व्हावी यासाठी आवश्यक त्या सर्व राजनैतिक संबंधांत संपूर्ण सहकार्याची तयारी दाखवली होती. जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतर देशांशी देखील अशाच प्रकारचे संबंध या कारणासाठी प्रस्थापित करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
डॉ. कृष्ण इला यांच्या कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेने आपात्कालिन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता मिळावी यासाठी एप्रिल महिन्यातच प्रयत्न केले होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने काही अधिकची माहिती बायोटेककडे मागितली होती. कंपनीने लवकरच आवश्यक ती कागदपत्रे सुपूर्द करणे अपेक्षित आहे.