भूस्खलनग्रस्त पापुआ न्यू गिनीला भारताची मदत!

आपत्ती निवारण साहित्याचे विमान रवाना

भूस्खलनग्रस्त पापुआ न्यू गिनीला भारताची मदत!

भूस्खलनाचा फटका बसलेल्या पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतासाठी भारताकडून आज (१३ जून) मानवतावादी आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) साहित्य पाठवण्यात आले आहे.गेल्या महिन्याच्या अखेरीस, भारताने भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर बेट राष्ट्राला १० लाख अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती.दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत तब्बल २००० नागरिकांचा मृत्यू झाला होता.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ट्विट करत याची माहिती दिली.ते ट्विट म्हणाले की, पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतात झालेल्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, भारताने आमच्या जवळच्या FIPIC भागीदाराला USD ची तात्काळ मदत जाहीर केली होती. या घोषणेनुसार, सुमारे १९ टन मानवतावादी आणि आपत्ती निवारण साहित्य घेऊन एक विमान आज पापुआ न्यू गिनीसाठी रवाना झाले आहे.

हे ही वाचा:

मुबिना युसूफकडून हिंदू मुलीवर धर्मांतर करून तिच्या मुस्लिम मित्राशी लग्न करण्यासाठी दबाव!

३०० कोटींच्या मालमत्तेसाठी सासऱ्याची हत्या; मारेकऱ्यांना एक कोटीची सुपारी!

हत्या करण्यासाठी फॅन क्लबच्या सदस्याचा वापर!

संत, धर्माचार्यांकडून ओम प्रमाणपत्राला भक्कम समर्थन, मोहीमेला दिले शुभ आशीर्वाद

भारताकडून पाठवण्यात आलेल्या साहित्यांमध्ये पाण्याच्या टाक्या, स्वच्छता किट डेंग्यू आणि मलेरिया डायग्नोस्टिक किट्स, बेबी फूड आणि आपत्कालीन वापरातील औषधांच्या संचाचा समावेश आहे.

Exit mobile version