कॅनडामध्ये भारतीयांना मारहाण करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीयांकडून चोख उत्तर

कॅनडामध्ये भारतीयांना मारहाण करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीयांकडून चोख उत्तर

कॅनडामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमादरम्यान खलिस्तान समर्थकांकडून भारतीय समुदायातील लोकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली होती. मिसिसॉगा येथे दिवाळीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात खलिस्तानी लोक घुसले आणि त्यांनी भारतीय समुदायांच्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. या घटनेवेळी उपस्थित पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही कारवाई केली नसल्याचं उपस्थित भारतीयांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर संतप्त हिंदूंनी खलिस्तान समर्थकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

कॅनडातील मिसिसॉगा येथे खलिस्तानींनी कार्यक्रमात घुसून गोंधळ घातला होता. कॅनडाच्या पोलीस प्रशासनानेही यावर बघ्याची भूमिका घेतली होती. भारतीयांचा झालेला अपमान आणि तिरंग्याचा केलेल्या अपमानानंतर खलिस्तानी लोकांना भारतीयांनी चोख उत्तर दिलं आहे. भारतीयांनी खलिस्तानी समुदायाच्या समोर गर्दी करून तिरंगा फडकावत खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश

मंदिरांवर हल्ले करणे आणि भिंतींवर खलिस्तानी नारे लिहिण्याचे प्रकार यापूर्वीही कॅनडातील खलिस्तानी समर्थकांनी केले आहेत. खलिस्तानचे समर्थन करणारे आणि खलिस्तान चळवळीशी संबंधित असलेले अनेक नेते कॅनडामध्ये आहेत. शिवाय तिथे अनेकदा उघडपणे भारतविरोधी कारवाया सुरू असतात. याआधीही ब्रॅम्प्टन शहरात बांधण्यात आलेल्या श्रीमद भगवद्गीता पार्कची तोडफोड करण्यात आली. ज्यावर स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

Exit mobile version