भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मुलभूत गरजा भागविण्यासाठी पाकिस्तानमधील नागरिकांना जबरदस्त धडपड कारवाई लागत असून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. नुकताच आशियाई विकास बँकेने (एडीबी) एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, आशियाई देशांपैकी पाकिस्तानमध्ये आयुष्य जगण्यासाठी आणि राहणीमानासाठी लागणारा खर्च हा सर्वाधिक आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. याचं गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानमधील नागरिक धडपडत असून तिकडची परिस्थिती गंभीर आहे. हा देश जगण्यासाठी सर्वांत महाग देश झाला आहे. आशियाई विकास बँकेने (एडीबी) नुकताच एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, आशियाई देशांपैकी पाकिस्तानमध्ये आयुष्य जगण्यासाठी लागणारा खर्च हा सर्वाधिक आहे. या देशात महागाई दर जास्त असल्यामुळे येथे जगण्यासाठी सामान्य लोकांना संघर्ष करावा लागत आहे.
सध्या पाकिस्तानध्ये महागाई दर हा २५ टक्के आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने (एसबीपी) महागाई दर २१ टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं लक्ष्य निश्चित केलं होतं. मात्र, हे लक्ष्य पाकिस्तानला साध्य करता आलेले नाही. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सातत्याने घटत आहे आणि म्हणूनच रोजच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानवर कर्ज वाढले असून परकीय गंगाजळीतही कमालीची घट झाली आहे.
हे ही वाचा..
नरेंद्र मोदींनी रामलल्लाच्या सूर्य टिळक अभिषेकाचे विमानातून घेतलं दर्शन
राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!
जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!
युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान
पाकिस्तानमध्ये रोजच्या लागणाऱ्या वस्तू महागल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे सध्या हा देश सर्वात महागडा देश ठरत असला तरी या देशाची अर्थव्यवस्था १.९ टक्क्यांनी वाढते आहे. पाकिस्तानला आर्थिक संकटासोबत राजकीय अस्थिरता, दहशतवादी हल्ले अशा काही संकटांचाही सामना करावा लागत आहे. जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, महागाईमुळे पाकिस्तानच्या साधारण एक कोटी लोकांची नव्याने गरिबीमध्ये गणना केली जाऊ शकते. सध्या येथे ९.८ कोटी लोक याआधीच गरिबीत जगत आहेत.