चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; येत्या काळात लाखो मृत्यू होण्याची भीती

रुग्णालये, स्मशाने भरली

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; येत्या काळात लाखो मृत्यू होण्याची भीती

ज्याठिकाणाहून कोरोनाचा उगम झाला असा संशय आहे, त्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजविला आहे. यावेळी तर जवळपास २० लाख मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असतानाही आता कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सरकारने झीरो कोविड पॉलिसी अंमलात आणली. पण त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झालेला असून रुग्णालये, स्मशाने यात प्रचंड भार आला आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उगम झाल्याचे तिथे दिसले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या पकडीत चीन सापडला आहे.

ट्विटरवर एरिक फिग्ल डिंग या एपिडेमिओलॉजिस्टने म्हटले आहे की, देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. डिंग हे अमेरिकेतले सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील शास्त्रज्ञ आहेत आणि कोविड टास्क फोर्सचे प्रमुखही आहेत.

दरम्यान, चीनने अशा वृत्तांना फारशी प्रसिद्धी दिलेली नाही. नोव्हेंबरपासून मात्र चीनमधअये ११ अधिकारी मृत झाले आहेत. तेव्हापासून रोज १० हजार लोक बाधित होत असल्याचे समोर येते आहे. काही व्हीडिओ समोर आले आहेत, ज्यात चीनमधील रुग्णालये खचाखच भऱल्याचे दिसते आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही रांगा लागल्या आहेत. तेथील कर्मचारीही रात्रंदिवस काम करत आहेत. अर्थात याला अधिकृत दुजोरा सरकारकडून आलेला नाही.

डिंग यांनी भीती व्यक्त केली आहे की, सध्या चीनमध्ये जी कोरोनाची लाट आली आहे त्यामुळे येत्या ९० दिवसात चीनमधील ६० टक्के जनता बाधित होऊ शकेल. त्यामुळे लाखो मृत्यू होण्याची शक्यताही आहे. शिवाय, यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होईल. हा परिणाम केवळ चीनपुरताच मर्यादित राहणार नाही. २०२३पर्यंत १० लाख लोक मृत्युमुखी पडल्याचे चीन कदाचित जाहीर करेल, असा अंदाज अमेरिका स्थित संस्थेने केला आहे.

Exit mobile version