पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिंगवाद; ‘पुरुषी’ खेळाडूने पराभूत केले महिला बॉक्सरला

जगभरात भेदभावाबद्दल टीका

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिंगवाद; ‘पुरुषी’ खेळाडूने पराभूत केले महिला बॉक्सरला

पॅरिस ऑलिम्पिक आता नव्या वादात सापडले आहे. इटलीच्या अँजेला कॅरिनीला अल्जेरियाच्या इमान खलिफने बॉक्सिंगमध्ये पराभूत केले. अवघ्या ४६ सेकंदात ही लढत संपली आणि या लढतीनंतर जगभरात ऑलिम्पिक आयोजनावर प्रचंड टीका झाली.

खलिफ ही खेळाडू पुरुषी असल्यामुळे हा वाद निर्माण झाला. टेस्टोस्टेरॉनचे शरीरातील प्रमाण जास्त असल्यामुळे गेल्या वर्षी खलीफवर ऐन स्पर्धेत बंदी घालण्यात आली पण त्याच खलीफला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश देण्यात आला आणि वाद झाला.

खलीफ भलेही महिला गटात खेळत असली तरी ती पुरुषी आहे. शरीरात  xy ही पुरुषांमधील गुणसूत्रे असली तरी तिला स्पर्धेत संधी देण्यात आली. २०२२ च्या बॉक्सिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते. पण गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या सुवर्णपदक सामन्याआधी तिला अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे यंदा ऑलिम्पिकमध्ये तिचा समावेश करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले गेले.

हे ही वाचा:

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का? |

वायनाडमधील आपत्तीग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेला धावून!

महाराष्ट्राचा नेमबाज धोनीला का मानतो आदर्श !

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

 

पराभूत झालेली इटलीची खेळाडू कॅरिनी म्हणाली की खलीफला स्पर्धेत घ्यावे अथवा नाही हे मी ठरवू शकत नाही, पण मला या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची होती ते माझे स्वप्न पूर्ण झाले नाही.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मात्र या प्रकरणात टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, २०२१ पासून अशा अनुवंशिकदृष्ट्या पुरुष असलेल्या खेळाडूबद्दल आपण टीका केली आहे. याबाबतीत आपण लक्ष द्यायला हवे आणि भेदाभेद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने मात्र या प्रकारच्या लढतीचे समर्थन केले असून असे १२४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version