पोलिसांशी संपर्क होणार सोपा

पोलिसांशी संपर्क होणार सोपा

लवकरच राहणार केवळ ११२ क्रमांक

महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सर्विस (एमईआरएस) लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी तयार होत आहे. मार्च अखेरपर्यंत ही सेवा प्रणली कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. या अंतर्गत सर्व सुरक्षा यंत्रणांचे विविध क्रमांक- १०० क्रमांक सुद्धा- केवळ ११२ या एका क्रमांकात समाविष्ट केल्या जातील. एमईआरएसमधील सुसुत्रता राखण्याची जबाबदारी अतिरिक्त महानिर्देशकांकडे देण्यात आली आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या २०१७-१८ पासून विविध निर्धारित वेळा चुकल्या आहेत. हा प्रकल्प गेल्या प्रजासत्ताक दिनाला कार्यान्वित होणे अपेक्षित होते. एस. जगन्नाथन या अतिरिक्त महानिर्देशकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे ८०-८५ टक्के काम पूर्ण झाले आहे  आणि मार्च अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करता येईल.

महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकल्पासाठीच ७ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्याबरोबरच या प्रकल्पाच्या तयारीचा भाग म्हणून १५०० चार चाकी गाड्या आणि २००० दुचाकी गाड्या देखील खरेदी करण्यात येणार आहेत. या पैकी ५० वाहनांची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती एस. जगन्नाथ यांनी दिली आहे.

प्रकल्पासाठी महिंद्रा डिफेन्स या खाजगी कंपनीला पाच वर्षासाठी कंत्राट देण्यात आले आहे. या क्रमांकासाठी दोन कॉल सेंटरची निर्मीती करण्यात येईल. एक नवी मुंबई आणि एक नागपूर येथे असेल. या केंद्रांत अनुक्रमे १०० आणि ४० कर्मचारी असतील.

हे काम कसे करेल?

महाराष्ट्र पोलिसांच्या ५४ कंट्रोल रुम्स महाराष्ट्रभर पसरलेल्या असतील. जगन्नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर केवळ ३०-४० सेकंदात त्या फोनचे जीपीएस स्थान शोधून स्थानिक पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुमकडे तो फोन सुपूर्त करण्यात येईल. त्यानंतर त्याभागातील वाहनाला फोन केलेल्या स्थानी पाठवण्यात येईल. ते वाहन फोन कर्त्याच्या जागी पोहोचून, फोन कर्त्याची समस्या सुटल्यानंतर त्याची योग्य प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच फोन बंद केला जाईल. या पद्धतीमुळे १०० टक्के फोन उचलले जातील आणि पोलिस मुख्यालयाकडे त्याची नोंद राहिल. मात्र लोकांना १०० आणि १०८ या क्रमांकांची खूप सवय असल्याने हे क्रमांक काही काळ अस्तित्त्वात राहतील. संपूर्णपणे ११२ क्रमांकाची सवय झाल्यानंतर हे क्रमांक रद्द करण्यात येतील.

Exit mobile version