26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाभारत जोडो यात्रेत खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन

भारत जोडो यात्रेत खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन

Google News Follow

Related

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. काहींना काही कारणामुळे ही यात्रा चर्चेत असते. पंजाबमधील फिल्लौरमध्ये सध्या यात्रा पोहचली आहे. या यात्रेतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. या यात्रेमध्ये जालंधरचे काँग्रेस खासदार चौधरी संतोख सिंह यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात ते फिरत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्यांना डॉक्तरांनी मृत म्हणून घोषित केले.

खासदार चौधरी संतोख सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांना फगवाड्याच्या विर्क रुग्णालयात आणण्यात आले. डॉ.जसजीत विर्क यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना रुग्णालयात आणत असताना डॉक्टरांच्या पथकाने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या निधनामुळे भारत जोडो यात्रा थांबवल्याची माहिती समोर येत आहे. राहुल गांधी त्यांच्या जालंधरच्या घरी रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी, त्यांनी फिल्लौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत १९९२ ते १९९७ या काळात काँग्रेस सरकारमध्ये राजिंदर कौर भट्टल आणि हरचरण सिंग ब्रार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

या अगोदर ऑक्टोबरमध्ये कर्नाटकातील बेल्लारी येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान ४ जणांना विजेचा धक्का बसला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मध्य प्रदेशात मध्य प्रदेशात यात्रा ओंकारेश्वर ते इंदूरकडे जात असताना ती ब्रेकमध्ये झालेलया बाचाबाचीमध्ये ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पडण्याची घटना घडली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा