कॅनडा प्रमुख ट्रुडोच खरे सूत्रधार?

काँग्रेसच्या रवनीत बिट्टू यांनी खलिस्तानी चळवळीचा आणि ट्रुडोंचा संबंध स्पष्ट केला

कॅनडा प्रमुख ट्रुडोच खरे सूत्रधार?

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अधिक चिघळत चाललेले असताना यात कॅनडाचे प्रमुख जस्टिन ट्रुडो हेच त्यांच्या देशात फोफावणाऱ्या खलिस्तानी चळवळीचे खरे सूत्रधार आहेत, अशाप्रकारचा संशय काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनी घेतला आहे.

 

 

या सगळ्या प्रकरणावर जेव्हा संसदेच्या बाहेर त्यांना पत्रकारांनी विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, ज्या हरदीपसिंग निज्जरबद्दल बोलले जात आहे, तो माझ्या आजोबांची हत्या करणाऱ्या जगतार सिंग हवारा याचा उजवा हात होता. ही निज्जर आणि कंपनी १० मोस्ट वाँटेड गँगस्टर्स आणि ड्रग पेडलरचा एक भाग होता. त्यातील आठ ड्रग पेडलर अजूनही कॅनडातच आहेत. बिट्टू यांनी सांगितले की, याआधी पाकिस्तान जसे करत होता, तीच आता कॅनडाची स्थिती झाली आहे. निज्जरसारखे सगळे ड्रग पेडलर हे भारतात अंमली पदार्थ पाठवत आहेत. आपल्या युवकांचे आयुष्य बरबाद करत आहेत. याच निज्जरसारख्या लोकांनी तेथील गुरुद्वारांवर आपल्या कब्जा मिळविला आहे. तिथे येणारा पैसा, देणग्या या ट्रुडो यांच्या पक्षाला पोहोचवला जातो. १० गुरुद्वारांवर त्यांनी आपले वर्चस्व मिळविले आहे.

 

 

रवनीत बिट्टू म्हणाले की, ट्रुडो भारतात आले होते तेव्हा त्यांचे विमान बिघडले आणि त्यांना ३६ तास इथेच रखडून राहावे लागले. तेव्हा भारताने त्यांना विमान देऊ केले पण ते त्यांनी न स्वीकारता आपले विमान दुरुस्त होईपर्यंत ते इथे आपले खटारा विमान घेऊन थांबले. याच ट्रुडो यांनी आमच्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानाची चौकशी करण्याची तयारी मात्र दर्शविली नाही.

हे ही वाचा:

कॅनडानंतर तुर्कीचा भारताशी पंगा

ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !

उदयनिधीची बकवास सुरूच; राष्ट्रपतींबाबत केले वादग्रस्त विधान !

मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !

 

ट्रुडो हे जी-२० परिषदेनिमित्त भारतात असताना त्यांना विशेष सूटची व्यवस्था इतर पाहुण्याप्रमाणे करण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली आणि स्वतंत्र व्यवस्था त्यांनी केली. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेल्यानंतर आता भारताने व्हीसाची प्रक्रियाच बंद केली आहे. त्यावरून बिट्टू यांनी ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच त्यांनी ज्या निज्जरचे समर्थन केले आहे, त्याचीही पोलखोल केली.

 

 

कॅनडात राहात असलेले भारतीय विद्यार्थी सध्या या व्हीसा बंदीमुळे चिंतेत आहेत. ज्यांना शिक्षणासाठी कॅनडात जायचे आहे, त्यांनाही आता समस्येचा सामना करावा लागतो आहे. पंजाबातून तब्बल पाच लाख विद्यार्थी तिथे आहेत. त्यातील अनेकांनी जमीन विकून किंवा कर्ज काढून ते तिथे शिक्षण घेत आहेत. तेव्हा त्यांच्या या समस्या लक्षात घ्याव्यात म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. तसेच त्यांची भेटही घेतली तेव्हा त्यांनी आपण यात लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version