पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला

तालिबानला ‘तेहरिक– ए- तालिबान- पाकिस्तान’ दहशतवादी संघटनेचा पाठींबा

पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला

एकीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमुळे पाकिस्तानी सरकार हतबल झालेलं असताना आता दुसरीकडे पाकिस्तानला अफगाणिस्तान सीमेवरही हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. तालिबानने पुन्हा एकदा डूरंड लाईनवर भीषण हल्ला केला आहे. तालिबानच्या बद्री युनिटच्या कमांडरने याची घोषणा केली असून पाकिस्तानी सैन्यासोबत भीषण संघर्ष सुरू असल्याची माहिती आहे. ‘नवभारत टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आपल्या क्षेत्रातच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केली होती. यानंतर मंगळवारी पाकिस्तानी तालिबानचा गड असलेल्या उत्तर-पश्चिमी पाकिस्तानमध्ये एका घरावर ड्रोनद्वारे पाकिस्तानने हल्ला केला होता. या कारवायांनंतर डूरंड लाईनवर तालिबानने जोरदार हल्ला केला आहे. तालिबानला तेहरिक ए तालिबान ए पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने पाठिंबा दिला असून ते या लढाईत उतरले आहेत.

हे ही वाचा:

“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होत असतात. या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेसोबत हातमिळवणी केली आहे. १० मे रोजी यासाठी दोन्ही देशांनी चर्चा केली आहे. पाकिस्तानमधील अनेक हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतलेली आहे. या दहशतवादी संघटनेला तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आसरा दिला असून तालिबानने हे आरोप मात्र फेटाळले आहेत.

Exit mobile version