तैवानमध्ये नव्या अध्यक्षांची निवड झाली असली तरी याचा चीनवर कोणताही परिणाम होणार नाही. तैवान हा चीनचाच एक भाग आहे, अशी दर्पोक्ती चीनने केली आहे. मात्र यावर तैवानचे नवनियुक्त अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी चीनच्या धमक्यांपासून राष्ट्राचा बचाव करणे हे माझे काम आहे, चीनपासून आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला आहे.
तैवानमध्ये निवडणुका झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानमध्ये काहीही बदल झाले तरी हे सत्य बदलणार नाही की जगात केवळ चीनच आहे आणि तैवान चीनचाच एक भाग आहे, असा दावा केला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या या सिद्धांताला समजून या प्रति गंभीरपणे पाहावे, असे म्हटले आहे. चीनचे नागरिक तैवानच्या स्वातंत्र्याला का विरोध करतात, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने समजून घ्यावे, असे म्हटले आहे. सन २०२३च्या अखेरीस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही तैवानला पुन्हा चीनमध्ये सामावून घेतले जाईल, असे स्पष्ट केले होते.
हे ही वाचा:
देशातील बहुतांश मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने
मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!
‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित
इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव
याबाबत तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाई चिंग ते यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘आम्ही आमच्या देशाला चीनच्या धमक्यांपासून वाचवण्याचे काम करू. मी आपल्या लोकशाही आणि स्वतंत्र घटतान्मक व्यवस्थेनुसार, संतुलित काम करेन. आम्ही चीनविरोधात आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला आशा आहे की, चीन भविष्यात स्वतःची नवी स्थिती जाणून घेईल. चीनने हे समजून घेतले पाहिजे की, आता शांततापूर्ण रीतीने चर्चा केल्यावर लाभ होईल. धमक्यांनी काहीच होणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.