26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाघनदाट जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह ४० दिवसानंतरही ४ मुले राहिली जिवंत

घनदाट जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह ४० दिवसानंतरही ४ मुले राहिली जिवंत

कोलंबियाच्या लष्कराने केलेल्या धडक मोहिमेला आले यश

Google News Follow

Related

ऐकावे ते नवलच असे म्हणतात. ऍमेझॉनच्या घनदाट जंगलात कुणी सापडला तर तो वाचणे केवळ अशक्य म्हणता येईल. पण ४० दिवसांपूर्वी याच जंगलात एक विमान कोसळले. त्यातील ११ महिन्यांच्या बाळासह ४ मुले मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली. ४० दिवस ही सगळी मुले जंगलातच होती पण ती कशी काय वाचली, इतके दिवस ती तिथे काय करत होती, अशा सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. ही सगळी मुले एका ठराविक आदिवासी समाजातील आहेत.

 

एका इंजिनासह असलेले हे छोटे विमान सहा जणांना घेऊन जात होते. त्यात पायलटसह सात जण होते. पण काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते उतरविण्याचा प्रयत्न सुरू असताना कोसळले. त्यातील पायलट, त्या मुलांची आई आणि त्या आदिवासी समाजाचा नेता अशा तिघांची त्यात मृत्यू झाला. पण ही चारही मुले मात्र बचावली आहेत.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्ताव पेट्रो यांनी यासंदर्भात ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण देशासाठी ही आनंदाची घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ४ मुले ४० दिवस कोलंबियाच्या जंगलात जिवंत राहिली. जंगलात एखाद्याने कसे जिवंत राहावे याचे एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल, असेही पेट्रो म्हणाले.

 

लेस्ली (१३), सोलेनी (९), तिएन (४) आणि ख्रिस्तिन (११ महिने) ही या वाचलेल्या चार मुलांची नावे आहेत. ही सगळी मुले हुईतोतो आदिवासी जमातीतील आहेत. गेले ४० दिवस ही मुले जंगलातच असल्यामुळे त्यांना हवे तसे अन्नपाणी मिळाले नाही पण तरीही त्यांची अवस्था सुदैवाने अगदीच बिकट झालेली नव्हती. कदाचित त्यांच्या आजीकडून त्यांना अशा बिकट परिस्थितीत कसे जगले पाहिजे, याचे शिक्षण मिळाल्यामुळे ती जिवंत राहू शकली असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

मंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक

‘लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे कार्याध्यक्षा पदी’

शरद पवारांनी भाकरी फिरवली; कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांची वर्णी

डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय 

जेव्हा हे विमान पडले त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी ते सापडले. कोलंबियाच्या या जंगलात ते पडल्याचे दिसून आले. पण तेथे ती मुले मात्र आढळली नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली. नंतर अपघातस्थळापासून ५०० मीटर अंतरावर खाल्लेली फळे, पावलांचे ठसे शोध घेणाऱ्या पथकाला आढळले. या मोहिमेला ऑपरेशन होप असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेत १५० सैनिक, त्या जंगलातील २०० आदिवासी जमातीतील लोक, १० बेल्जियन शेफर्ड कुत्रे यांचा समावेश होता. त्यांनी ३२३ चौरस किलोमीटरचा परिसर पिंजून काढला.

 

त्याचवेळी हेलिकॉप्टरमधून या मुलांची आजी हुईतोतो भाषेत मुलांना आवाहन करत होती. जिथे असाल तिथेच राहा. आम्ही तुमची सुटका करण्यासाठी आलो आहोत. शुक्रवारी पहाटे ५ वाजता लष्कराच्या रेडिओवरून चमत्कार, चमत्कार असे शब्द ऐकू आले. ती मुले सापडली होती. त्यानंतर लष्कराने मुले सापडल्यावर काही फोटो ट्विट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा