रोनाल्डोने कोका कोलाला पाजले पाणी

रोनाल्डोने कोका कोलाला पाजले पाणी

मंगळवार, १५ जून हा दिवस कोका कोला कंपनीसाठी ४ बिलियन डॉलर्सचे नुकसान घेऊन आला आणि या नुकसानाला कारणीभूत ठरला पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो. मंगळवारी रोनाल्डो पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी रोनाल्डोने कोका कोला या पेयाच्या बाटल्या बाजूला सारल्या. यामुळे कंपनीचा शेअर घसरला तर कंपनीचे बाजार मूल्य २४२ बिलियन डॉलर्सवरून २३८ बिलियन डॉलर्सवर खाली आले. थोडक्यात कंपनीचे चार बिलियन डॉलर्सचे नुकसान नोंदवले.

सध्या युरो कप फुटबॉल स्पर्धा ही दिमाखात सुरू असून मंगळवारी पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यात सामना पार पडला. या सामन्याच्या आधी पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने माध्यमांशी संवाद साधला. कोका कोला ही कंपनी युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एक असल्यामुळे पत्रकार परिषदेत टेबलवर कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. पण ख्रिस्तियानो रोनाल्डो याने माध्यमांशी बोलताना कोका कोलाची बाटली बाजूला सारत पाण्याची बाटली हातात घेतली. यावेळी रोनाल्डोने ‘ऍक्वा’ असे म्हणत पाणी पिण्याला उत्तेजन दिले.

हे ही वाचा :

‘काँग्रेस, शिवसेनेचे आरोप बोगस निघाले’

संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळतंय

मुंबई क्रिकेटचे दरवाजे अंकितसाठी उघडणार?

रोनाल्डोच्या या क्रियेने कोको कोला कंपनीला आर्थिक फटका बसला असून त्याचे परिणाम शेअर बाजारात दिसू लागले. कोको कोलाच्या शेअरची किंमत खाली उतरून कंपनीचे बाजार मूल्यही कमी झाले. प्रेस कॉन्फरन्सच्या आधी कोका कोलाचे बाजार मूल्य हे २४२ बिलियन डॉलर्स इतके होते. तर पत्रकार परिषदेनंतर कोका कोलाचे मूल्य २३८ बिलियन डॉलर्स झाले.

Exit mobile version