बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

डुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीजवळ घडली घटना

बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

पाकिस्तानमधील अशांत आणि अस्थिर समजल्या जाणाऱ्या बलूचिस्तान प्रांतातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुचिस्तानमधील एका कोळसा खाणीवर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात खाणकाम करणाऱ्या २० मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बलुचिस्तानमधील डुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीजवळ राहणाऱ्या लोकांच्या घरांना गुरुवारी रात्री काही बंदुकधारी लोकांनी घेराव घातला. त्यानंतर या लोकांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये २० जण जागीच ठार झाले, तर सातजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमधील बहुसंख्य लोक हे बलूचिस्तानमधील पश्तून-भाषी भागातून आले होते. तसेच मृतांमध्ये तीन अफगाणिस्तानी लोक आहेत. जखमींमध्येही काही अफगाणिस्तानी लोक आहेत.

अशांत बलुचिस्तान प्रांतात अलीकडच्या काळातील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये एक मोठी सुरक्षा शिखर परिषद होणार आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे धाबे दाणादाणले आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नसून हे असे क्षेत्र आहे जेथे मोठ्या संख्येने फुटीरतावादी नेते राहतात आणि त्यांच्या स्वातंत्र्याची मागणी करतात. या लोकांचा आरोप आहे की पाकिस्तानी सरकार स्थानिक लोकांना डावलून तेल आणि खनिज समृद्ध बलुचिस्तानचे शोषण करत आहे.

हे ही वाचा :

पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला देवी कालीचा मुकुट बांगलादेशातील मंदिरातून गेला चोरीला

इस्रायलकडून मध्य बेरूतमध्ये हवाई हल्ला; २२ ठार

‘दुर्मिळ रत्न हरपले’

‘रतन टाटा….एक युग संपले’

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची बैठक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही यात सहभागी होणार आहेत. त्याआधी पाकिस्तानमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेने सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे.

Exit mobile version