आमच्यासाठी संपूर्ण जग हाच आपला स्वदेश आहे

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताचा उदय

आमच्यासाठी संपूर्ण जग हाच आपला स्वदेश आहे

मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये १७ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन सुरू झाले आहे. विविध देशातून हजारो अनिवासी भारतीय या संमेलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाला पंतप्रधानी मार्गदर्शन केले.

पंतप्रधान म्हणाले, स्वदेशो भुवनत्रयम् म्हणजे “आपल्यासाठी संपूर्ण जग हा आपला स्वदेश आहे, मानव हेच आपले भाऊ-बहीण आहेत” या वैचारिक पायावरच आपल्या पूर्वजांनी भारताच्या सांस्कृतिक विस्ताराला आकार दिला. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारीमुळे चार वर्षांनंतर या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. १३० कोटी भारतीयांच्यावतीने मी तुमचे येथे स्वागत करतो. जागतिक व्यापाराची एक विलक्षण परंपरा आपण शतकांपूर्वी सुरू केली. अमर्याद वाटणारा समुद्र आपण पार केला. विविध देश, विविध सभ्यता यांच्यातील व्यावसायिक संबंध सामायिक समृद्धीचा मार्ग कसा खुला करू शकतात हे भारताने दाखवून दिले आहे.

जागतिक मंचावर भारताचा आवाज

आज भारताकडे आशेने आणि कुतूहलाने पाहिले जात आहे. जागतिक मंचावर भारताचा आवाज ऐकू येत आहे,भारत या वर्षीच्या जी२० चे यजमानपदही भूषवत आहे. आम्हाला हा राजकीय कार्यक्रम नाही तर लोकसहभागाचा कार्यक्रम बनवायचा आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत, तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फुटेल!

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

बॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे

आम्हाला आमची जमीन माहिती आहे, जे हवेत आहेत त्यांची तपासणी करायला हवी

सर्व भारतीय प्रवासी भारताचे ब्रँड एम्बेसेडर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपण सर्व भारतीय प्रवासी भारताचे ब्रँड एम्बेसेडर म्हणतो. भारताचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून तुमची भूमिका वैविध्यपूर्ण आहे. तुम्ही मेक इन इंडिया, योग, हस्तकला उद्योग तसेच भारतातील बाजरीचे ब्रँड एम्बेसेडर आहात.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताचा उदय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारताचा उदय होत आहे. त्याचबरोबर सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version