मुंबई ठाणे शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले. यामुळे लवकरच ठाण्यावरून मुंबईत प्रवासासाठी आता वाहतूक कोंडीमुळे सुटका होणार आहे.
कोपरी पूल हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए अंतर्गत तैयार झाला असून या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न थोड्या प्रमाणांत कमी होणार आहे. कोपरी पुलामुळे ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण,डोंबिवली येथून जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणांत मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी या पुलामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई आणि ठाण्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी ठाणे शहरातील कोपरी येथे दोन पथ मार्गिकेच्या रेल्वे ओलांडणी पुलाचे चार पथ मार्गिकेमध्ये रुंदीकरण करण्यात आले आहे. या ओलांडणी पुलाचा सर्व खर्च एमएमआरडीए मार्फत करण्यात आला आहे. तर या रेल्वे मार्गिकांवरील भागांचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले आहे.
या बांधकामाचा निधी प्राधिकरणाकडून रेल्वेला देण्यात आला आहे. या पुलाची एकूण लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर हा पाच मार्गिकांचा असून ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पूल हा दोन मार्गिकांचा होता. याच अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे चाकरमान्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणांत वाहतूक कोंडी होत होती.
हे ही वाचा:
अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप
श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात
पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद
आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला
हीच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण आणि बांधकाम करण्यात आले. आहे. दोन पथ मार्गिकेच्या पुलाचे चार पथ मार्गिका असा श्रेणीसुधार करण्यात आल्यामुळे,मुंबई ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन त्याचा फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.
या प्रकल्पामध्ये नौपाडा जंकशन ते ज्ञानसाधना महाविद्यालयांपर्यंत महामार्गाखालून वाहनांच्या रहदारीकरता दोन पथ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग सुद्धा बांधण्यात आला आहे. प्रस्तावित असलेले नवीन कोपरी स्टेशनला जोडणारा वाहनांसाठी भुयारीमार्ग तर पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधला आहे. तसेच पावसाळ्यात चिखलवाडी परिसरातील पाण्याचा निचरा होण्याकरता चिखलवाडी नाला ते साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जलवाहिनीची ज्याला स्ट्रॉम वॉटर ड्रेनची सुद्धा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.
कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा आता एक महत्वाचा दुआ आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त वेळेत वाहनचालकांना अगदी थोड्या एवढीच प्रवास करायला सुद्धा ३० ते ४० मिनटे लागत होती. पण आता प्रवाशांचा बहुमोल वेळ वाचणार आहे. पूर्व द्रुत गती महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणांत कोंडी होत होती. आता या नवीन पुलामुळे नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि आता ठाणे तीन हात नाका परिसरात वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घाट होणार आहे. असे एम एम आर डी ए चे महानगर आयुक्त श्रीनिवास म्हणाले आहेत.