धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी

धबधब्यात अचानक काळकडा कोसळला; ७ मृत्युमुखी

ब्राझीलमध्ये एका धबधब्यात कडा कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शनिवारी ८ जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण गंभीर जखमी आहेत. तर तिघेजण बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये धबधब्याजवळ असलेल्या डोंगराचा पूर्ण कडा पाण्यात कोसळत असताना दिसतो. यावेळी खाली दोन बोटी होत्या त्यांच्यावर हा कडा कोसळला आहे. या बोटींमधील काही लोकांचा मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले आहेत. काही लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा:

‘सुली डील्स’च्या मास्टरमाइंडला अटक

काय आहे SPG सुरक्षा कवच?

रतन टाटांचा जीवनप्रवास लवकरच वाचकांच्या भेटीला

उपाहारगृहे, हॉटेल्स, नाट्यगृहे, मॉल यांच्यावर आता हे नवे निर्बंध

ब्राझीलमधील मिनास गेराईस याठिकाणी शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. गेल्या दोन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस या परिसरात पडत असल्यामुळे या दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी अजूनही शोधकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डायव्हर्स आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. रुग्णालयाची यादी चेक केल्यानंतरच नेमकी बेपत्ता नागरिकांची संख्या स्पष्ट होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version