काही दिवसांपूर्वी इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला होता. या हल्ल्यात नसरल्लाची मुलगी ही देखील मारली गेली होती. आता यामध्ये नसरल्लाचा जावई देखील ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसरल्लाचा जावई हसन जाफर अल-कासिर हा ठार झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने बुधवारी (१ ऑक्टोबर) सीरियाची राजधानी दमास्कसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात हसन जाफर अल-कासिरसह आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हसन जाफर अल-कासिरचा भाऊ मोहम्मद जाफर कासीर हाही बेरूतवर नुकत्याच झालेल्या इस्रायल हल्ल्यात मारला गेला होता. १९८२ मध्ये लेबनॉन युद्धानंतर दोन्ही भावांनी दहशतवादाच्या जगात प्रवेश केला होता. मात्र, आता दोघांनाही इस्रायलने मारले आहे.
अमेरिकेने हसन जाफर अल-कासिरला जागतिक दहशतवादी घोषित करून १० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८३ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले होते. हसन जाफर अल-कासिरचा मृत्यू हिजबुल्लाला धक्का असल्याचे मानले जात आहे.
हे ही वाचा :
‘देवा इस्रायलला शक्ती दे, जेणेकरून सर्व नसरल्लांचा खात्मा होवो’
एसबीआयच्या बनावट शाखेने गावकऱ्यांना फसवले
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या फाऊंडेशन विरोधात अहवाल मागवणाऱ्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान ड्रग्ज विकते
दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी इस्रायलने बेरूतमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह आणि त्याची मुलगी झैनब मारली गेली होती. या हल्ल्यात इस्रायलने ८० टन वजनी बॉम्बचा वापर केला होता.