म्यानमारमध्ये गृह युद्ध सुरू असून काही बंडखोरांकडून लष्कराविरोधात बंड सुरू आहे. हे बंड शमण्याची चिन्हे दिसत नसून म्यानमारचे सैन्य बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. अशातच आता चीन सीमेला लागून असलेल्या एक मुख्य सैनिकी तळावर बंडखोरांनी कब्जा केला आहे. त्यामुळे म्यानमार सैन्याचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.
म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीने चीनला लागून असलेल्या लॅशियो शहरावर कब्जा केला असून बंडखोरांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, सरकारी सैन्यासोबत २३ दिवस चाललेल्या लढाईत विजय मिळवला आहे. त्यांच्या सैनिकांनी विजय मिळवला असून शत्रू सैनिकांना हटवले जात आहे.
हे ही वाचा..
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध
खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !
रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!
अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजातून १४ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका
म्यानमारमधील लढाई २०२१ पासूनच सुरू असून येथील अस्थायी लोकशाहीनंतर म्यानमारचे सैन्य २०२१ मध्ये सत्तेवर आले. म्यानमारमध्ये अनेक दिवसांपासून गृहयुद्ध सुरू आहे. हे अंतर्गत युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी हा एक अल्पसंख्याक बंडखोर गट आहे जो म्यानमारच्या सैन्यासमोर उभा ठाकला आहे. म्यानमार सानिकांच्या ताब्यातील प्रदेश ताब्यात घेण्यासाठी हा गट लढत आहे. यासाठी बंडखोरांनी एक आंदोलनही चालवले होते. ज्याच्या माध्यमाने त्यांनी सत्ता कमकुवत केली. यानंतर या लढाईचे पर्यवसान गृहयुद्धात झाले. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, या गृहयुद्धात म्यानमारचे अनेक लोक मारले गेले आहेत, तसेच २६ लाखहून अधिक लोक विस्थापितही झाले आहेत.