पश्चिम आशियातील देश असलेल्या सीरियातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली असून सीरिया सरकारच्या विरोधात बंडखोर सातत्याने वेगवेगळ्या भागांवर हल्ले करत आहेत. शिवाय या भागांचा ताबा ते स्वतःकडे घेत आहेत. अशातच या तणावाच्या परिस्थितीकडे भारत सरकार सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
सीरियामधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून शुक्रवारी सीरियामधील भारतीयांसाठी ऍडवायजरी जारी करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांना सीरियामध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, सीरियातील परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांना या संदर्भात पुढील माहिती मिळेपर्यंत सीरियामध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीरियामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर +963993385793 वर संपर्क साधता येईल, असे सांगितले आहे. शिवाय hoc.damascus@mea.gov.in वर ईमेल देखील करता येणार आहे. जे सध्या सीरियात आहेत त्यांनी तेथून लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करावा आणि असे होईपर्यंत त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
हे ही वाचा:
मसूद अझहरच्या भाषणाच्या वृत्तानंतर भारताने पाकला ‘दुटप्पीपणा’वरून सुनावले
मालेगाव मनी लाँडरिंग प्रकरण: ईडीकडून १३.५ कोटी रुपये जप्त
हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…
ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…
देशातील सर्वात मोठे शहर अलेप्पोचा बहुतेक भाग ताब्यात घेतल्यानंतर, बंडखोरांनी गुरुवारी मध्य सीरियन शहर होम्सवर कब्जा केला आहे. हजारो लोकांना त्यांची घरे सोडावी लागली आहेत. होम्स शहर आता सीरियातील बंडखोरांच्या लक्ष्यावर आहे. हे शहर बंडखोरांच्या ताब्यात गेल्यास दमास्कसचा अनेक शहरांशी संपर्क तुटणार असल्याचे बोलले जात आहे. होम्सच्या दिशेने बंडखोरांच्या वाटचालीचे वृत्त समोर आल्यापासून हजारो लोकांनी आपली घरे सोडली आहेत. हे लोक सीरियन सरकारकडे मदत आणि संरक्षण दोन्ही मागत आहेत. सीरियामध्ये गेल्या १३ वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. सध्या सीरियामध्ये काही अरब देश, अमेरिका आणि इस्रायल समर्थित सशस्त्र गट राष्ट्राध्यक्ष असद यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. माहितीनुसार, सध्याचे सीरिया सरकार अडचणीत असल्याचे पाहून इराणने मदतीचा हात पुढे केला आहे. इराणने राष्ट्राध्यक्ष असद यांना क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर शस्त्रेही पुरवल्याचे बोलले जात आहे.