विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे टीसींशी रोज होत आहेत वाद

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे टीसींशी रोज होत आहेत वाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने शिथिल करायला सुरुवात केली असली तरी सामान्य नागरिकांना अजूनही रेल्वे प्रवासाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळेच सर्वसामान्य नागरीक वैतागले असून प्रवास करू द्या, नाहीतर आम्ही विनातिकीट प्रवास करू असा जणू गर्भित इशाराच ते देऊ लागले आहेत. त्यातूनच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून त्यांचे तिकीट तपासनीसांशी वाद झडू लागले आहेत. आता दोन लसी घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वेप्रवास खुला केला असला तरी असंख्य लोक रेल्वेने प्रवास करू इच्छितात. त्यांच्यापुढे अन्य पर्याय नाही.

सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा आहे. असे असतानाही मागील महिन्यात प्रवाशांची संख्या ही दिवसाला पाच लाखांवरून १५ लाखांवर गेलेली आढळून आली. यातील अनेक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करतात. कारवाईची भीती असूनही कुटुंबाच्या पोषणासाठी असा प्रवास केला जातो, असे रेल्वे सुरक्षा बलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

चुकीच्या पद्धतीने प्रवास करणारे प्रवासी हे बहुतांश वेळा रोजंदारीवर काम करणारे असतात आणि नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांना तिकीट तपासनीसांनी पकडल्यास ते वाद घालू लागतात. असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रोजचा पगार कमावणाऱ्या व्यक्तींना रोज त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाणं गरजेच असत. खाजगी कंपन्या, हॉटेल्स हे सुद्धा सुरू झाले परंतु त्यांनाही रेल्वे प्रवास करता येत नाही. टाळेबंदीच्या पूर्वी तीन ते चार महिन्यातून एकदा कधीतरी असे तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमधील वाद समोर येत असत.

हे ही वाचा:

१ कोटी महिलांना मिळणार लाभ; पंतप्रधानांनी केली घोषणा

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे कालवश

एल्गार परिषदप्रकरणी १५ जणांविरूद्ध आरोपपत्र

१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?

कल्याणचे रहिवासी रमेश ठाकूर यांनी सांगितले की, त्यांच्या घाटकोपर येथील ऑफिसमध्ये जाण्यासाठी ते दुचाकीचा वापर करत असत, पण त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. पण प्रवासासाठी टॅक्सी वापरणे खूपच खर्चिक आहे आणि बसने खूप वेळ खर्च होतो.

सध्या आम्हाला दाखवण्यात येणारे ९० टक्के ओळखपत्रे ही खोटी असतात. अनेक डॉक्टरांनी त्यांच्या शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना आरोग्य सेवेतील ओळखपत्रे बनवून दिली आहेत. अशी खोटी ओळखपत्रे पकडली गेली की लोक वाद घालू लागतात, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका तपासनीसानी दिली. काही वाद हे अगदी विकोपाला जातात असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version