अभिनेत्री ख्रिसन परेराची अखेर शारजातील तुरुंगातून सुटका झाली आहे. अमली पदार्थांची नेआण केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती पण तिला फसविण्यात आल्याचे नंतर लक्षात आल्याने अखेर तिची सुटका झाली आहे.
शारजा येथे गेलेली असताना सोबत असलेल्या ट्रॉफीत अमली पदार्थ होते. त्यामुळे तिला पकडण्यात आले होते. पण आता तिची सुटका झाली आहे. तिला फसविणाऱ्या अँथनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बोभाटे यांना अटक करण्यात आली आहे.
२७ वर्षीय ख्रिसनने सडक २ आणि बाटला हाऊस या चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात होती. तिच्या आईचे अँथनी पॉलशी भांडण झाले होते. त्याचा राग येऊन अँथनीने त्यांना फसविण्यासाठी कट रचला. त्यातून ही घटना घडली.
बोरिवली येथील रहिवासी असलेल्या अँथनीने बोभाटे या आपल्या सहकाऱ्यासह हा कट रचला. बोभाटे हा सिंधुदुर्गचा रहिवासी आहे. एका आंतरराष्ट्रीय वेबसीरिजमध्ये काम मिळवून देतो हे आमीष दाखवत पॉलने ख्रिसनला फसवले. तिला दुबईला पाठवत असताना सोबत एक ट्रॉफीही पाठवली. त्यात पॉल आणि त्याच्या सहकाऱ्याने अमली पदार्थ लपवून ठेवले होते. ते ख्रिसनच्या लक्षात आले नाही. तिथे पोहोचल्यावर तिला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्यात आले. पॉलने अशाचप्रकारे अन्य काही लोकांना फसविल्याचेही समोर आले आहे.
हे ही वाचा:
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्याचा बोर्नव्हिटाला आदेश
तो शिकवत होता, फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र…
प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?
एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी
ख्रिसनच्या आईने यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी यासंदर्भात ख्रिसनची कशी सुटका होईल, यासाठी मदत केली जाईल, असे सांगितले होते.