आर्थिक फसवणूक प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमिनिका येथे अटक करण्यात आल्यानंतर आता भारताकडे सोपविण्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. वेस्ट इंडिज बेटांमधील अँटिगा येथे असलेला चोक्सी तिथून फरार झाला होता. पण त्याला डॉमिनिका येथून ताब्यात घेण्यात आले. इंटरपोलने त्याची शोधमोहिम सुरू केली होती. त्याच्यावर लुकआऊट नोटीस जारी केली होती. आता अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी चोक्सी याला थेट भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी डॉमिनिकाकडे केली आहे. ब्राऊन यांनी म्हटले आहे की, चोक्सीने अँटिगा बेट सोडण्याची गंभीर चूक केली आहे. आता आम्ही त्याला पुन्हा आमच्या देशात स्थान देणार नाही. डॉमिनिका सरकार आम्हाला सहकार्य करत असून चोक्सी याला थेट भारताच्या स्वाधीन करावे असे आम्ही त्यांना सांगितले आहे.
चोक्सी २०१८पासून अँटिगात राहात होता. पण आता त्याला डॉमिनिकात ते कायदेशी अधिकार मिळणार नाहीत, जे त्याला अँटिगात होते. २०१७मध्ये त्याने अँटिगा आणि बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. आर्थिक गुंतवणूकीचे कारण पुढे करत तो या देशांचा नागरीक बनला होता. त्यानुसार त्याला त्या देशात कायदेशीर हक्क प्राप्त झाले होते.
हे ही वाचा:
लॉकडाउन वाढणार का अनलॉक होणार?
कोरोना न होताही आमदार क्वॉरन्टीन
ठाकरे सरकारमध्ये शिवसेनाच नाराज?
काँग्रेसचे ‘सेक्युलॅरिझम’: मंदिरांचे स्पीकर हटवले, मशिदींवरील भोंगे जैसे थे
भारतातील पंजाब नॅशनल बँकेच्या १३५०० कोटी कर्ज वितरण प्रकरणातील फसवणूक प्रकरणी चोक्सी भारताला हवा आहे. अँटिगातून फरार होण्यापूर्वी तो अँटिगात जेवण घेतानाचे शेवटचे त्याला पाहिले होते. मात्र त्यानंतर तो गायब होता. त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यावरून अँटिगातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले होते.
मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेतून १३५०० कोटींचा घपला केलेला आहे. चोक्सी अँटिगात राहात आहे तर निरव मोदी लंडनमध्ये आहे. या दोघांची सीबीआयमार्फत सध्या चौकशी सुरू आहे.