कुरापती चीनचे गुप्तचर जहाज हिंदी महासागरात

काही वर्षांपासून चीनच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या

कुरापती चीनचे गुप्तचर जहाज हिंदी महासागरात

भारताचा शेजारी चीनच्या कुरापती अद्याप सुरूच असून घुसखोरीची एकही संधी चीन सोडत नसल्याचे समोर आले आहे. चीनचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच असून आता भारताच्या सागरी सीमांमध्ये चीनचा घुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीनचे शक्तिशाली गुप्तचर जहाज हिंदी महासागरात घुसल्याची माहिती समोर आली आहे.

चीनचे गुप्तचर जहाज ‘शी यान- ६’ हे हिंद महासागरात दाखल झाले असून ते धीम्या गतीने आणखी पुढे सरकत आहे. यासंबंधीची माहिती श्रीलंकेने दिली आहे. चीनच्या या हालचालींबद्दल श्रीलंकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. चीनचे शक्तिशाली गुप्तचर जहाज ‘शी यान- ६’ हे हिंदी महासागरात घुसून पुढे सरकत असल्याचे श्रीलंकेने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे हे गुप्तचर जहाज हिंदी महासागराच्या मधोमध ९० अंश पूर्वेकडे आहे. हे जहाज सध्या श्रीलंकेच्या दिशेने पुढे जात असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनच्या हिंदीमहासागरात हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भारताला धोका निर्माण झाला आहे.

आकडेवारीनुसार, २०१९ पासून चीनने सुमारे ४८ चिनी वैज्ञानिक संशोधन जहाजे हिंदी महासागरात तैनात केली आहेत. चीनने हिंदी महासागराच्या आयओआर क्षेत्रात अनेक वैज्ञानिक जहाजे तैनात केली आहेत. ही जहाजे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे अरबी समुद्राच्या बाजूने पर्शियन गल्फकडे जाणाऱ्या क्षेत्रात आहेत. चीन हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्तापित करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या या खुणा असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

श्रीलंकेकडून चीनी जहाज डॉक करण्याची परवानगी

‘शी यान-६’ हे जहाज विज्ञान आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीनच्या १३ व्या पंचवार्षिक योजनेतील एक प्रमुख प्रकल्प आहे. उद्घाटनानंतर दोन वर्षांनी, २०२२ मध्ये या जहाजाने पूर्व हिंदी महासागरात आपला पहिला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला होता. श्रीलंकेच्या विक्रमसिंघे सरकारने ऑक्टोबरमध्ये या चिनी संशोधन जहाजाला कोलंबो बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली आहे.

हे ही वाचा

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

‘शी यान- ६’ हे एक वैज्ञानिक संशोधन जहाज असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. हे जहाज राष्ट्रीय जलीय संसाधन संशोधन आणि नॅशनल एक्वाटिक रिसोर्सेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट एजन्सी (NARA) सोबत मिळून संशोधन करते, असं चीनचं म्हणणं आहे. मात्र, हे गुप्तचर जहाज असल्याचा दावा इतर देशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version