पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये चर्चा झाली होती, कोरोना विषाणूच्या अस्त्राची

पाच वर्षांपूर्वी चीनमध्ये चर्चा झाली होती, कोरोना विषाणूच्या अस्त्राची

कोरोनाच्या विषाणूची चीनमधून उत्पत्ती झाल्याचे अनेक दाखले कोरोनाच्या संक्रमणानंतर केले गेले. त्याला पुष्टी देणारे नवी माहिती आता पुढे आली असून चीनी शास्त्रज्ञांनी सार्स कोरोना विषाणू हे जनुकासंदर्भातील शस्त्रांचे नवे युग घेऊन येतील असे नमूद करणारा अहवाल २०१५मध्ये तयार केल्याचे ऑस्ट्रेलियनने म्हटले आहे. म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी पाच वर्षे आधीच शास्त्रज्ञांनी ही शक्यता वर्तविली होती.

हे ही वाचा:

नेस्को कोवीड सेंटरमध्ये डॉक्टर,नर्सेसचे आंदोलन

ममता बॅनर्जींचे वरातीमागून घोडे

युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री

पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

सार्सचा अनैसर्गिक उगम आणि मानवनिर्मित विषाणूंच्या नव्या प्रजाती : जनुकांविषयी जैविक शस्त्रे या विषयाखाली लिहिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, तिसरे जागतिक युद्ध अशा जैविक अस्त्रांनी लढले जाईल.

कोरोनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याआधीच पाच वर्षांपूर्वी चीनच्या लष्करी शास्त्रज्ञांनी सार्स कोरोनाविषाणूचा शस्त्र म्हणून उपयोग करण्याविषयी चर्चा केली होती. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्स म्हणतात की, चिनी शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या विविध प्रकारांचा वापर शस्त्र म्हणून करण्याचा विचार केला होता. त्यामुळेच कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी तपास करण्यास चीनचा का विरोध होता, हे या कागदपत्रांवरून स्पष्ट होते.

चिनी सरकारच्या या फुटलेल्या कागदपत्रांची तपासणी करणारे रॉबर्ट पॉटर म्हणतात की, हे कागद नक्कीच बनावट नाहीत. उलट हे किती गंभीर आहेत हेच त्यातील माहितीवरून स्पष्ट होते. चिनी शास्त्रज्ञ कोणत्या थराला जाऊन विचार करू शकतात, हेच या कागदपत्रातून दिसून येते.

आतापर्यंत कोरोनामुळे जगात ३२ लाख लोकांचा मृत्यू झालेला असून १५ कोटी लोक बाधित झालेले आहेत.

 

 

 

Exit mobile version