आठ महिन्यांनी चिनी कबुतराची पिंजऱ्यातून सुटका

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात झाले होते स्पष्ट

आठ महिन्यांनी चिनी कबुतराची पिंजऱ्यातून सुटका

हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या चीनी कबुतराला मुंबई पोलिसां कडून क्लीन चिट देण्यात आली आहे.मागील आठ महिन्यापासून पिंजऱ्यात बंद असलेल्या या कबुतराची मंगळवारी परळ बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयातुन सुटका करण्यात आली आहे.

हे कबुतर आरसीएफ पोलिसांना ८ महिन्यापूर्वी पिरपाव बंदर येथे जखमी अवस्थेत मिळून आले होते, त्याच्या पंखावर चीनी भाषेत सांकेतिक शब्दात लिहण्यात आले होते तसेच कबुतराच्या पायामध्ये एक चीप आढळून आली होती. चीनचे सैनिक हेरगिरीसाठी कबुतराचा वापर करीत असल्याचा संशया वरून या कबुतराला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आले होते. पशुवैद्यकीय रुग्णालयात या कबुतरावर उपचार करून त्याच्या पायातील चीप आणि पंखावर लिहलेले सांकेतिक शब्दाचे छायाचित्रे फॉरेन्सिक लॅबकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते ,अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली.

परळ परिसरातील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स रुग्णालयात उपचार घेणारे चीनी कबुतर केव्हाच बरे होऊन ठणठणीत झाले होते.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ५८ आयपीएसच्या बदल्या

ज्ञानवापी प्रकरणात हिंदूंचा मोठा विजय, मशिदीच्या तळघरातील व्यासजींच्या पूजेला मिळाली परवानगी!

कर्नाटक: टिपू सुलतानच्या फोटोला चपलेचा हार!

इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांची शिक्षा, यावेळी पत्नीही शिक्षेस पात्र!

फॉरेन्सिक लॅबचा अहवाल देखील केव्हाच आला होता,या अहवालात हे कबुतर हेरगिरी साठी नाही तर तैवान येथे होणाऱ्या रेसिंग मधील कबुतर असल्याचे त्याच्या पायातील चीप वरून स्पष्ट झाले होते, हे कबुतर चुकून तैवान येथून भारतात येणाऱ्या मालवाहू जहाजातून आले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

सोमवारी आरसीएफ पोलिसांनी परळ परिसरातील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स रुग्णालयाला पत्र पाठवून कबुतराला सोडून देण्यासाठी हरकत नासल्याचे म्हटले होते. जर कबुतर पूर्णपणे बरे आणि रोगमुक्त झाले असेल तर त्याला मुक्त करण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले होते. या पत्राच्या आधारे परळ परिसरातील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी या कबुतराला पिंजऱ्यातून मुक्त केले.

Exit mobile version