कराची विद्यापीठातील स्फोटात चिनी नागरिकांचा मृत्यू

कराची विद्यापीठातील स्फोटात चिनी नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात स्फोट झाल्याची घटना मंगळवार, २६ एप्रिल रोजी घडली आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. महिलेने बॉम्बस्फोट घडवून आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कराची विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.

कराची विद्यापाठीतील कन्फ्यूशियस इंस्टीट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये स्फोट झाला. कन्फ्यूशियस इंस्टीट्यूटमधून ही व्हॅन परतत होती. कराची विद्यापीठातील हे चिनी भाषा केंद्र आहे. दरम्यान, कराची विद्यापीठातील व्हॅनला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक पाढंऱ्या रंगाची व्हॅन जळताना दिसत आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या दृश्यानुसार या व्हॅनजवळ एक बुरखा परिधान केलेली महिला उभी होती. व्हॅन तिच्या जवळ येताच स्फोट झाल्याने हा आत्मघाती स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल होणार

लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!

व्हॅनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून या हा अपघात आहे की दहशतवादी कृत्य याचा शोध सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version