ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

भारताला गोवण्याचा होता हेतू

ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

चीनमधील एक प्रसिद्ध ब्लॉगर जेनिफर जेंग हिने आरोप केला आहे की, कॅनडामधील दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या एजंटचा सहभाग होता. या हत्येनंतर चीनचा उद्देश भारत आणि पाश्चिमात्य देशांमध्ये क्लेष निर्माण करण्याचा होता.

जेनिफर जेंग ही चिनी वंशाची माहिती अधिकार कार्यकर्ती, पत्रकार आहे. सध्या ती अमेरिकेत वास्तव्य करते. ‘आज शीख धार्मिक नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासे सीसीपीमधून समोर आले आहेत. ही हत्या सीसीपीच्या एजंटने घडवून आणली होती,’ असे एक्स या सोशल मीडियावर आढळून आले आहे. जेंग हिने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ चिनी लेखक आणि युट्युबर लाओ डेंग यांच्या दाव्याचाही उल्लेख केला आहे. ते कॅनडात राहतात.

 

 

‘लाओने याच वर्षी जूनच्या सुरुवातीला सांगितले होते की, सीसीपीने त्यांच्या योजनेनुसार, राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला अमेरिकेतील सिएटलमध्ये पाठवले होते. तिथे एक गुप्त बैठक आयोजित केली होती. त्यांचा उद्देश भारत आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध बिघडवण्याचा होता. या एजंटांनी कॅनडात शीखनेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे काम सोपवले होते. बैठकीनंतर सीसीपीच्या एजंटनी या हत्येचा कट काळजीपूर्वक तडीस नेला,’ असे जेंगने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त

श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर

‘भारताला दहशतवादाची सखोल समज’

 

मारेकरी मुद्दामहून भारतीय वळणाचे इंग्रजी शिकले होते. जेणेकरून हत्येचा आरोप भारतावर जाईल. १८ जून रोजी चिनी एजंटांनी निज्जरचा माग काढला होता. जेव्हा काम पूर्ण झाले. तेव्हा त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी गाडीमधील डॅश कॅमेरेही नष्ट केले. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पलायन केले. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी हत्यारे आणि कपडेही जाळून टाकले. दुसऱ्या दिवशी ते विमानाने कॅनडातून निघाले, असाही दावा जेंगने केला आहे.

Exit mobile version