प्लास्टिकच्या विळख्यात पुन्हा एकदा चीन…
पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिकच्या विळख्यात आता चीन पूर्णपणे अडकल्याचे दिसून येत आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम हि जागतिक डोकेदुखी ठरत आहे. याला पर्याय म्हणून विघटनशील प्लॅस्टिकचा वापर वाढू लागला आहे. मात्र प्लॅस्टिकच्या विघटनासाठी चीनने जो वेळ द्यायला हवा होता तो वेळ न दिल्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या उद्भवू लागली आहे.
चीनने मोठ्याप्रमाणात विघटनशील प्लॅस्टिकला प्रोत्साहन दिले. आणि अविघटनशील प्लॅस्टिकवर बंदी आणली. त्यामुळे चीन जगातील सर्वात मोठा प्लॅस्टिक कचरा उत्पादक देश बनला आहे.
ग्रीनपीस या संघटनेने दिलेल्या अहवालानुसार चीनमध्ये विघटनशील प्लॅस्टिकचे नव्याने उत्पादन करण्यासाठी ३६ कंपन्या तयारित आहे. त्यामुळे चीनच्या एकूण उत्पादनात वार्षिक ४४ लाख टन प्लॅस्टिक उत्पादनाची भर पडणार आहे.
मात्र इतक्या मोठ्याप्रमाणात तयार होणाऱ्या प्लॅस्टिकचे विघटन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना चीन सरकारकडे नाहीए. सामान्य कचऱ्याप्रमाणे प्लॅस्टिक सुद्धा जमिनीमध्ये गाडले जाणार आहे. मात्र त्याचे विघटन होणे अशक्य आहे.
ग्रीनपीस संघटनेच्या दक्षिण आशिया विभागाचे प्लॅस्टिक विषयातील संशोधक डॉ. मॉली झाँगनान यांच्या म्हणण्यानुसार, बंदिस्त आणि सुसज्ज केंद्राच्या अभावामुळे हे प्लॅस्टिक नद्या आणि समुद्राच्या पाण्यात जाऊन मिळत आहे. त्यामुळे जगभरात प्लॅस्टिकवर बंदी आणली, तरचं प्रदुषणाचा प्रश्न सुटणार आहे, असेही झाँगनान यांनी सांगितले.
( बीबीसीमधून साभार )