कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने जगभरात हाहाकार माजवला असून चीन सरकारकडून मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दडपशाही सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने अजब मार्ग शोधून काढला असून कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांना प्रशासनाकडून धातूच्या बॉक्समध्ये बंदिस्त करून ठेवत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सुमारे दोन कोटी लोकांना चीनमध्ये विलगीकरणाच्या नावाखाली कैद करून ठेवले आहे. शी जिनपिंग यांनी शून्य कोविड धोरणांतर्गत नागरिकांवर बंधने घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार लोकांना मोठ्या बॉक्ससदृश्य जागांमध्ये विलगीकरणात ठेवले जात आहे.
Millions of chinese people are living in covid quarantine camps now!
2022/1/9 pic.twitter.com/wO1cekQhps— Songpinganq (@songpinganq) January 9, 2022
‘डेली मेल’च्या अह्वालानुसरा कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना चीनच्या शीआन, युझोऊ आणि आन्यांग प्रांतांमध्ये लोखंडाच्या मोठ्या बॉक्समध्ये विलगीकरणासाठी ठेवण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील वेगवेगळ्या बॉक्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?
ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट
लडाख प्रशासनाने उर्दूबद्दल घेतला हा मोठा निर्णय
विलगीकरणाच्या नावाखाली सुमारे दोन कोटी लोकांना कैद करण्यात आले आहे. शीआनमध्ये १ कोटी ३० लाख लोक त्यांच्या घरांमध्ये विलगीकारणात आहेत. त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. याशिवाय अनेक लोकांना लोखंडाच्या बॉक्स मध्ये बंद करण्यात आले आहे. या बॉक्समध्ये शौचालय, पिण्याचे पाणी आणि झोपण्यासाठी पलंग अशा मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत.
परिसरातील एक व्यक्ती जरी कोरोना बाधित आढळून आली तर त्या परिसरातील सर्वांना बसमध्ये बसवून हे बॉक्स असलेल्या ठिकाणी नेले जाते आणि तिथे त्यांना २१ दिवस सक्तीने ठेवले जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास चार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.
Tianjin city
Authority is busy sending tens of thousands of people off to covid quarantine camps with hundreds of buses now.
Only one covid case found in your apartment building,all residents of your building will be sent off to covid quarantine camps.
2022/1/10 pic.twitter.com/q3LdHLGYb3— Songpinganq (@songpinganq) January 11, 2022