पाकिस्तानशी हातमिळवणी केल्यास चीनची नैतिकता घसरेल- हवाई दल प्रमुख

पाकिस्तानशी हातमिळवणी केल्यास चीनची नैतिकता घसरेल- हवाई दल प्रमुख

“चीनने भारताला लक्ष्य करण्यासाठी जर पाकिस्तानची मदत घेतली तर त्यांनी त्यांची नैतिकता घालवली असेल.” असे परखड वक्तव्य हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी सांगितले. त्यापुर्वी चीन अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची हातमिळवणी करत असल्याची शक्यता नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाच्या घटत्या सामर्थ्यावर भदौरिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता यापुढे हवाई दलाचे सामर्थ्य केवळ वाढवले जाईल.

“माझ्या मतानुसार जर त्यांनी (चीनने) अशा प्रकारे हातमिळवणी केली तर त्यांनी त्यांची नैतिकता गमावली असेल. लढाईतील एक साथीदार म्हणून तुम्हाला जर दुसऱ्या देशाला धोका निर्माण करण्यासाठीही तिसऱ्या एखाद्या देशाची मदत लागणार असेल तर तुम्ही तुमची कमतरता दाखवत आहात. पण जर आपण एकत्रित धोक्याचा विचार करणार असू, तर तो चीनकडून आहे असं मला वाटत नाही.” असे हवाई दल प्रमुख आर. के. एस भदौरिया यांनी द हिंदू या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ही मुलाखत भदौरिया यांनी सध्या चालू असलेल्या एअरो इंडिया येथे दिली होती.

यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानची रणनिती, चीनसोबत पूर्व लडाखमध्ये चालू असलेल्या संघर्षाबाबत देखील वक्तव्य केले. त्याबरोबरच एचएएलला दिलेल्या ८३ तेजस विमानांच्या ऑर्डरचा देखील त्यांनी उल्लेख केला.

Exit mobile version