अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे शांतताप्रिय देशामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान या परिस्थितीत चीनने तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
China says willing to develop 'friendly relations' with Afghanistan's Taliban: AFP News Agency
— ANI (@ANI) August 16, 2021
एएफपी या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, चीनने अफगाणिस्तानमध्ये तालिबानसोबत “मैत्रीपूर्ण संबंध” तयार करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने असेही म्हटले आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा तो तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय सहमती इतर बाबतीत सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. तर पाकिस्तानने काबूलमधील आपले दूतावास बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालिबानच्या समर्थकांनी अफगाणिस्तानच्या सामान्य नागरिकांकडे असलेली शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानची राजवट असल्यानं नागरिकांना खासगी शस्त्रास्त्र बाळगण्याची गरज नसल्याचं तालिबान्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय तालिबानकडून बँकेत काम करणाऱ्या महिलांनी कामावर येऊ नये, असा फतवा काढण्यात आलाय. महिला कर्मचाऱ्यांनी हे विचित्र आहे पण वास्तव असल्याचं म्हटलंय.
हे ही वाचा:
अनिल देशमुखला भागौडा घोषित करा
आसाम काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राजीनामा
कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट
मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान सोडल्यानंतर गनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्याकडे त्यावेळी दोन पर्याय होते. राष्ट्रपती भवनात प्रवेश करणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांचा सामना करणे हा पहिला पर्याय होता. किंवा ज्या देशाच्या सुरक्षेसाठी मी माझ्या आयुष्याचे २० वर्ष खर्च केली तो देश सोडून जाणे हा दुसरा पर्याय होता.