नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत

ड्रोन पुरविण्याबरोबरच, दूरसंचार मनोरे उभारण्यात आणि भूमिगत केबल टाकण्यासाठीही चीनची मदत

नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत

चीनकडून भारत विरोधी कारवाया सुरूच असून चीनने पाकिस्तानला हाताशी घेऊन कुरापती करायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास, तसेच पाकिस्तानला ड्रोन पुरविण्याबरोबरच दूरसंचार मनोरे उभारण्यात आणि भूमिगत केबल टाकण्यासाठीही चीन मदत करत असल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीन- पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सी-पेक) आणि जलप्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी ही केंद्रे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये उभारण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनकडून पाकिस्तानला होणारी ही मदत म्हणजे पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र म्हणून स्वतःचे स्थान आणखी ठळक करण्याबरोबरच पाकव्याप्त काश्‍मीरमधील स्वत:च्या केंद्रांची सुरक्षा निश्‍चित करण्याचा प्रयत्न आहे.

ट्रकवरून मारा करणारी एसएच- १५ ही हॉवित्झर तोफही नियंत्रण रेषेवर दिसून आल्याची माहिती आहे. नव्याने विकसित केलेली ही तोफ मागील वर्षी पाकिस्तान दिनाच्या संचलनात सामील करण्यात आली होती. चिनी सैन्य २०१४ नंतर नियंत्रण रेषेवर दिसले नव्हते मात्र, सध्या चिनी सैन्य आणि अभियंते पायाभूत सुविधा निर्माण करत असल्याचे आढळून आले आहे.

हे ही वाचा:

असुद्दिन ओवेसींच्या रॅलीत ‘औरंगजेब’ अवतरला

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज

‘सी-पेक’द्वारे चीनमधील शिनजिआंग प्रांत कराची बंदराला रस्तेमार्गाने जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी चीनने तब्बल ४६ अब्ज डॉलर खर्च केला आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिनी सैन्याची हालचाल सीमा भागात दिसून येत आहे.

Exit mobile version