चीन आपल्या आण्विक शस्त्रागाराचा झपाट्याने विस्तार करत आहे आणि “२०३० पर्यंत हजारपेक्षा जास्त वॉरहेड्स तयार करण्याचा मानस आहे.” असे पेंटागॉनच्या नवीन अहवालात लिहीले आहे. “मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) 2021″ या शीर्षकाच्या अहवालात, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या मुख्यालयाने म्हटले आहे की पीआरसीच्या अणुविस्ताराच्या वेगवान गतीमुळे देशाला ” २०२७ पर्यंत ७०० अण्वस्त्र तयार करण्याइतका अणुविस्तार करणे शक्य होईल.”
“चीन २०३० पर्यंत किमान हजार वॉरहेड्स ठेवण्याची शक्यता आहे.” अहवालात असेही म्हटले आहे की ते पेंटॅगॉनच्या मागील वर्षाच्या अंदाजापेक्षा लक्षणीयरित्या पुढे जाईल. २०२० मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने २०३० पर्यंत चीनकडे ४०० अण्वस्त्रे असतील असा अंदाज व्यक्त केला होता.
अहवालात असेही म्हटले आहे की, “चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे आणि त्याच्या जमीन, समुद्र आणि हवाई तळावरील आण्विक वितरण प्लॅटफॉर्मची संख्या वाढवत आहे. विस्तारास समर्थन देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करत आहे.”
“पीआरसीने अण्वस्त्र सक्षम हवेतून प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ALBM) विकसित करून आणि जमिनीवर आणि समुद्रावर आधारित आण्विक क्षमतांमध्ये सुधारणा करून एक नवजात ‘अण्वस्त्र ट्रायड’ स्थापित केले आहे,” पेंटागॉनने अहवालात म्हटले आहे.
“फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या आणि पुनःप्रक्रिया सुविधा बांधून प्लुटोनियमची निर्मिती आणि वेगळे करण्याची क्षमता वाढवून देश त्याच्या आण्विक विस्ताराला पाठिंबा देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.”
हे ही वाचा:
दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय उत्सव जाहीर
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल
भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट
“२०२० मधील नवीन घडामोडी पुढे सूचित करतात की पीआरसी विस्तारित सायलो-आधारित शक्तीसह लॉन्च-ऑन-वॉर्निंग (LOW) स्थितीकडे जावून त्याच्या आण्विक सैन्याची शांतताकालीन तयारी वाढवण्याचा मानस आहे.” पेंटागॉनने अहवालात असेही म्हटले आहे.