चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे समोर आले होते. २० जानेवारी रोजी भाजपचे अरुणाचल पूर्वचे खासदार तापीर गाओ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता चीनने १७ वर्षीय भारतीय तरुण मीरम तरोन याची सुटका करण्यात असल्याचे सांगितले.
भारतीय लष्कराने केलेल्या संवादानंतर मीरमच्या सुरक्षित परतीच्या विनंतीवर, चिनी सैन्याने निर्धारित प्रोटोकॉलनुसार त्या तरुणाला भारताकडे सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेला यासाठी सात ते दहा दिवस लागू शकतात.
भाजपचे अरुणाचल पूर्वचे खासदार तापीर गाओ यांनी ट्विट करत या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली होती. तापीर गाओ यांनी ट्विटरवर म्हटले होते की, १८ जानेवारी रोजी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि मीरम तरोन आणि त्याचा मित्र जॉनी यायिंग या दोन तरुणांचे अपहरण केले. हे दोघेही झिडो गावातील राहणारे असून यापैकी मीरम याचा मित्र चिनी सैन्याच्या तावडीतून निसटण्यास यशस्वी झाला असून मीरमबद्दल अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
ओमायक्रोनच्या धास्तीने ‘या’ पंतप्रधानांनी त्यांचच लग्न केलं रद्द
…अमिताभने लेस बांधताना दिली मुलाखतीची अपॉइंटमेंट
अक्कल’शून्य’ कारभारामुळे जमा झाले ३ कोटीऐवजी ३२ कोटी
खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना चिनी सैन्याने एका मुलाचे अपहरण केल्याची माहिती देत सरकारी यंत्रणांनी या मुलाची लवकर सुटका करण्याची विनंती केली होती.