कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

China's Peng Shuai reacts during her first round singles match against Japan's Nao Hibino at the Australian Open tennis championship in Melbourne, Australia, Tuesday, Jan. 21, 2020. (AP Photo/Andy Brownbill)

कम्युनिस्ट पक्षाच्या उच्च पदाधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर चीनची टेनिस स्टार पेंग शुईही गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. हे प्रकरण समोर आल्यावर जगभरातील अनेक टेनिसपटू आणि अनेक टेनिस संघटनांनी चीनने याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. मात्र, चीनकडून यावर कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

टेनिसपटू पेंग शुई हिने २ नोव्हेंबरला चीनमधील प्रसिद्ध सोशल मीडिया माध्यम वीबोवर कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अर्ध्या तासातच पेंग हिची पोस्ट डिलीट करण्यात आली आणि तेव्हापासून पेंग शुई हिच्या बाबतीत काहीच माहिती नसून ती सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसूनही आलेली नाही.

हे ही वाचा:

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार

दरम्यान चीनच्या सरकारी माध्यमांनी ई-मेलचे काही स्क्रीनशॉट टाकून ते मेल पेंग हिने केल्याचा दावा केला आहे. तसेच मेलमध्ये पेंग हिने आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. महिला टेनिस संघाला (WTA) केलेले हे मेल असून महिला टेनिस संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष स्टीव्ह साइमन यांनी या मेलवर शंका व्यक्त करत हे मेल नक्की पेंग हिनेच केले आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणाची योग्य ती दखल न घेतल्यास चीनशी व्यावसायिक संबंध संपवण्यात येतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.

३५ वर्षीय पेंग शुई ही चीनमधील तियांजीनमध्ये राहत असून तिने महिला दुहेरीत उत्तम कारकीर्द करून दोन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. प्रथम तिने २०१३ मध्ये विम्बल्डन आणि नंतर २०१४ मध्ये फ्रेंच ओपन जिंकले. फेब्रुवारी २०१४ मध्ये ती पहिल्यांदाच दुहेरीत जगातील क्रमांक एकची खेळाडू बनली.

Exit mobile version