भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

भारतीय सैनिकांची आक्रमकता आणि पर्वतांवर लढण्याची क्षमता कौतुकास्पद

भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

लडाखमध्ये चीनच्या सीमेलगत असणाऱ्या वास्तविक नियंत्रण रेषा आणि अरुणाचल प्रदेश सीमेवर भारतीय सैनिकांची क्षमता पाहून चीनला धडकी भरली आहे. त्यामुळे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने(पीएलए) आता तिबेटी सैनिकांना तैनात केले गेले आहे.

उंच असणाऱ्या या सीमेवर भारतीय सैनिकांशी लढण्यासाठी चिनी सैनिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०२०मध्ये भारताशी झालेल्या संघर्षानंतर चीनने भारतीय सैनिकांची आक्रमकता आणि पर्वतांवर लढण्याची क्षमता बघितली होती. त्यामुळे चीनने त्यांच्या ताब्यातील तिबेटमधील नागरिकांची लष्करात भरती करण्यास सुरुवात केली होती.

हे ही वाचा:

वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष

मालाडमध्ये झाड पडून एकाचा मृत्यू, विक्रोळीत भिंत कोसळली

सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण

मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!

पर्वतावर दीर्घकाळ राहण्यासाठी प्रत्येक तिबेटी कुटुंबातील किमान एक सदस्याला तरी लष्करात भरती करण्याचे प्रयत्न त्याने सुरू केले आहेत. भारताच्या स्पेशल फ्रंटिअर फोर्सचे सैनिक त्यांच्या सैनिकांपेक्षा अधिक सक्षम आहेत, हे चीनने पाहिले आहे. विशेषत: तिबेटी सैनिक कैलास पर्वतावरील उंच शिखरे काबीज करण्याच्या प्रयत्नात चिनी सैनिकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत आहेत.

चीनच्या नीतीचा विरोध

चीनने आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना तिबेटी सैनिकांच्या भरतीच्या कामाला लावले आहे. तिबेटी कुटुंबातून किमान एक सदस्य चीनच्या लष्करात सामावून घेतल्यास अधिकाधिक तिबेटी नागरिक चीनप्रती प्रामाणिक होतील, हीदेखील यामागील चीनची रणनिती आहे.

Exit mobile version