साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनची पुन्हा आडकाठी

साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनची पुन्हा आडकाठी

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला दहशतवाद्यांच्या काळा यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिका आणि भारत यांनी संयुक्त राष्ट्रांपुढे मांडला होता. मात्र, चीनने याला खोडा टाकत हा प्रस्ताव पुन्हा रोखला आहे. साजिद मीर हा २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आहे. गेल्या चार महिन्यात तिसऱ्यांदा चीनने या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करुन काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. भारत आणि अमेरिकेने हा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे या प्रस्तावानुसार मीरची मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रात्र बंदी सारखे निर्बंध लावण्यात येणार होते.

हे ही वाचा:

मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

हॉस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

साजिद मीर हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून त्याच्यावर अमेरिकेने ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस ठेवले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेत साजिद मीर हा दहशतवादी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीत टाकण्याच्या अमेरिका आणि भारताच्या प्रस्तावालाही गेल्या महिन्यात चीनने थांबवून ठेवला होता.

Exit mobile version