24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाभारतीय लष्कराच्या डॉक्टरचे चीनकडून अपहरण आणि हत्या

भारतीय लष्कराच्या डॉक्टरचे चीनकडून अपहरण आणि हत्या

Google News Follow

Related

नव्या पुस्तकात धक्कादायक खुलासा

भारत आणि चीन सैन्यात दोन वर्षांपूर्वी पूर्व झालेल्या रक्तरंजित संघर्षाशी संबंधित आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. चीनने सुरुवातीपासूनच आपल्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या लपवून ठेवली आहे पण भारतीय सैनिकांवरील चिनी सैन्याची क्रूरता सहनशक्तीच्या पलिकडची आहे. चीनच्या सैनिकांनी आपल्या जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी भारतीय लष्कराच्या एका डॉक्टरचे अपहरण केले आणि उपचारानंतर त्यांची हत्या केली. इंडियाज मोस्ट फिअरलेस ३ : न्यू मिलिटरी स्टोरीज ऑफ अनइमॅजिनेबल करेज अँड सॅक्रिफायसेस या पुस्तकात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

शिव अरुर आणि राहुल सिंह या दोन पत्रकारांनी आपल्या या पुस्तकामध्ये जून २०२० मध्ये घडलेल्या या घटनेचे विस्ताराने वर्णन केलेले पाहायला मिळते. या लष्करी संघर्षात भारतीय लष्कराच्या डॉक्टरांनी अनेक चीनी सैनिकांचा जीव वाचवला पण नंतर चिनी सैनिकांनी डॉक्टरांची निर्घुणपणे हत्या केली असे या पुस्तकात म्हटले आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले, हे पुस्तक प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि १५ ऑगस्टच्या सुमारास प्रकाशित होणार आहे.२०जून २०२० च्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या भयानक संघर्ष नाट्याचा घटना क्रम या पुस्तकातील प्रथमच दस्तऐवज आहे आणि भारतीय सैन्य आणि चीनी सैनिक यांच्यातील भांडणाची प्रथमच माहिती देते.

भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यादरम्यान १५ जून २०२० च्या रात्री चकमक उडाली. या चकमकीत एका कर्नलसह २० भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले होते. मात्र या संघर्षात आपले सैनिकही मारले गेले हे चीन मानायला तयार नव्हते. पण नंतर चीनने आपले चार सैनिक मारले गेल्याचे कबूल केले होते.

चीनने आपले नुकसान लपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अपप्रचाराचा अवलंब केल्याचेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. पुस्तकानुसार, चीनने आपल्या जखमी सैनिकांना स्वतःहून सोडून दिले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरने अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. डॉ दीपक सिंग यांनीही अनेक भारतीय जवानांचे प्राण वाचवले.

हे ही वाचा:

‘कितीही ‘काळी जादू’ केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही’

राष्ट्रगीत गातानाच वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक खाली कोसळले आणि

‘मला क्लिन चीट मिळालेली आहे’

शाळकरी मुलांनो ‘जंकफूड’ला करा आता बाय-बाय….

 

गलवान खोऱ्यातील चकमकीत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचा सरकारने सन्मान केला आणि सरकारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि त्यांना शहीदांचा योग्य दर्जा देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षण अधिकारी बिपिन रावत यांनीही जखमी जवानांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली होती. डॉ. दीपक यांच्या बलिदानासाठी, त्यांना मरणोत्तर वीर चक्र, युद्धकाळातील दुसरा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला होता.

दीपक सिंग यांनी वाचवले ३० पेक्षा जास्त जवानांचे प्राण

या संघर्षात नाईक दीपक सिंग यांनी ३० हून अधिक भारतीय जवानांचे प्राण वाचवले. संघर्षात जखमी झालेल्या चिनी सैनिकांचे प्राणही त्यांनी वाचवले होते, ही बाब आता उघड झाली आहे. त्यांच्यावर चिनी सैन्याने अमानुष हल्ला केला. नाईक दीपक सिंग हे लष्करात वैद्यकीय कर्मचारी म्हणून तैनात होते. रणांगणात ते जखमी सैनिकांवर उपचार करण्यात गुंतले होते. यावेळी त्यांनी भारतीय जवानांसोबतच मानवधर्म साधत चीनच्या जखमी सैनिकांवरही प्राथमिक उपचार केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा