कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

सीमा भागात कुरापती करणाऱ्या चीनच्या सैन्याने (पीपल्स लिबरेशन आर्मी) पुन्हा धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. भाजप खासदार तापीर गाओ यांनी ही माहिती दिली असून केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

भाजपचे अरुणाचल पूर्वचे खासदार तापीर गाओ यांनी ट्विट करत या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली आहे. तापीर गाओ यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, १८ जानेवारी रोजी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. सीमेवरील अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर (चीनने येथे भारतीय हद्दीच्या आत तीन ते चार किलोमीटरचा रस्ता बनवला आहे) येथून त्यांनी मीरम तरोन आणि त्याचा मित्र जॉनी यायिंग या दोन तरुणांचे अपहरण केले. हे दोघेही झिडो गावातील राहणारे आहेत. यापैकी मीरम याचा मित्र चिनी सैन्याच्या तावडीतून निसटण्यास यशस्वी झाला असून मीरमबद्दल अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही.

मीरमच्या मित्रानेच या घटनेची माहिती भारतीय लष्कराला सांगितल्याचे गाओ यांनी सांगितले असून मीरमच्या सुटकेसाठी केंद्र सरकारच्या सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती गाओ यांनी केली आहे.

हे ही वाचा:

कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

मुलायम परिवारातही आता भा’जप’

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

दरम्यान, सप्टेंबर २०२० मध्ये चिनी सैन्याने अशाचप्रकारे अप्पर सुबानसीरी जिल्ह्यातून पाच तरुणांचे अपहरण केले होते. त्यानंतर आठवड्याने या सर्वांची सुटका करण्यात आली होती. सीमा भागात चीनच्या कुरापती सुरूच असून या घटनांमुळे सीमेजवळ तणाव आणखी वाढत आहे.

Exit mobile version