28 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरदेश दुनियादहशतवादी रौफ अझर चीनला हवाहवासा; काळ्या यादीत टाकण्यास नकार

दहशतवादी रौफ अझर चीनला हवाहवासा; काळ्या यादीत टाकण्यास नकार

भारताकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये दहशतवादी रौफ अजहरचा प्रतिबंधित यादीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव

Google News Follow

Related

दहशतवादी रौफ अझर याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे. त्यामुळे चीनची दहशतवादाबद्दल असलेली दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये दहशतवादी रौफ अझर याचा १२६७ आयएसआयएल आणि अल कायदा प्रतिबंधित यादीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र चीनने या प्रस्तावाला विरोध केला.

अब्दुल रौफ अझर हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. अजहरला काळ्या यादीमध्ये टाकावे, असा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडला. मात्र चीनने या प्रस्तावाला आक्षेप घेतला आहे. रौफ अझर हा जैशच्या मसूद अझरचा भाऊ आहे. १९९९ मधील इंडियन एअरलाइन्सच्या एईसी ८१४ विमानाचे अपहरण, २००१मधील संसदेवरील हल्ला आणि सन २०१६ मधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ला यांसह अन्य दहशतवादी कटांतही रौफ अजहरचा सहभाग होता.

अमेरिकेने सन २०१०मध्ये रौफ अझर याच्यावर बंदी घातली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही चीनने रौफ अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारत आणि अमेरिकेच्या प्रस्तावाविरोधात मतदान करून तो रोखला होता.

हे ही वाचा:

“सरकार घटनाबाह्य असल्याच्या बाष्कळ बाता ठाकरेंनी बंद कराव्यात”

मोदींवर आरोप झाले,आता पाकिस्तानातील जाळपोळ रास्व संघ, भाजपाने केल्याचा दावा

रक्ताच्या पिशव्या गरजूंपर्यंत उडत गेल्या!

आता महाभारत येणार १० भागांत, राजामौली लिहिणार पटकथा

चीन हा सातत्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या बाजूने निर्णय घेताना दिसतो. दहशतवादाविरोधी लढाईत आपण एकत्र असू, असे सांगणारा चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र सातत्याने दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानची बाजू घेताना दिसतो. आताही चीनने पाकिस्तानच्या दहशतवाद्याला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याने चीनची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा