भारताविरुद्ध चीनच आक्रमकाच्या भूमिकेत

भारताविरुद्ध चीनच आक्रमकाच्या भूमिकेत

अमेरिकन अधिकाऱ्याचे जाहीर वक्तव्य

“चीन हिमालय सीमेवर भारताच्या विरोधात आक्रमक आहे.” असं सांगत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बीजिंगचे पुढील दूत म्हणून नामांकित केलेल्या एका शीर्ष अमेरिकन मुत्सद्दीने सांगितले की, अमेरिकेने चीनच्या सरकारला नियमांचे पालन न केल्याबद्दल जबाबदार धरले पाहिजे.

निकोलस बर्न्सने सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीच्या सदस्यांना बुधवारी त्याच्या पुष्टीकरणाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, जिथे बीजिंगने अमेरिकेच्या मूल्यांच्या आणि हितसंबंधांच्या विरोधात कारवाई केली आहे तिथे, अमेरिका चीनला मोठे आव्हान देईल.

“बीजिंग हिमालय सीमेवर भारताविरुद्ध आक्रमक आहे. व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि दक्षिण चीन समुद्रातील इतरांविरुद्ध, पूर्व चीन समुद्रात जपान विरुद्ध; आणि ऑस्ट्रेलिया आणि लिथुआनियाविरुद्ध धमकावण्याची मोहीम सुरू केली आहे.” असं बर्न्स म्हणाले.

चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर सार्वभौमत्वाचा दावा करतो. व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स, ब्रुनेई आणि तैवान या सर्व देशांचे दावेही या भागात आहेत.

बीजिंग दक्षिण चीन सागर आणि पूर्व चीन समुद्र या दोन्ही भागात वादग्रस्त प्रादेशिक वादात गुंतले आहे. त्याने या प्रदेशातील अनेक बेटे आणि खडकांवर नियंत्रण आणि सैनिकीकरण केले आहे. दोन्ही क्षेत्रे खनिजे, तेल आणि इतर नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहेत. जे जागतिक व्यापारासाठी देखील अत्यावश्यक आहेत.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

२००५ ते २००८ या कालावधीत अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून काम करणारे बर्न्स म्हणाले की, “झिंजियांगमधील चिनी नरसंहार आणि तिबेटमधील गैरवर्तन, हाँगकाँगच्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्यांवर गदा आणणे, आणि तैवानसमोर सुरु असलेली गुंडगिरी अन्यायकारक आहे आणि ती थांबली पाहिजे. ”.

Exit mobile version