युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत भारतासह चीन, ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्पष्ट केली भूमिका

युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत भारतासह चीन, ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात

गेली अनेक महिने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटले असून दोन्ही देशांना मोठी जीवितहानी आणि वित्तहानी सोसावी लागली आहे. मात्र, तरीही दोन्हीही देश माघार घ्यायला तयार नसून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आता याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी तीन देशांची नावे घेतली असून हे देश मध्यस्थी म्हणून भूमिका निभावू शकतात अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

रशियाच्या युक्रेनसोबतच्या संभाव्य शांतता चर्चेत चीन, भारत आणि ब्राझील हे मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात, असे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, आमचा मुख्य उद्देश युक्रेनचा डोनबास प्रदेश ताब्यात घेणे आहे. चर्चेला नकार दिलेला नाही. रशियन सैन्य हळूहळू कुर्कमधून युक्रेनियन सैन्याला मागे हटवत आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

अटल सेतूवरून उडीमारून बँकरची आत्महत्या !

तेलंगणात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा !

बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली

‘तीनमूर्ती’ची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती

पुतीन यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे कारण, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्धग्रस्त युक्रेन आणि त्यापूर्वी रशियाला गेले होते. पंतप्रधान मोदींच्या या दोन्ही दौऱ्यांवर साऱ्या जगाचे लक्ष होते. नरेंद्र मोदी जुलै महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल’ देऊन सन्मानित केले. रशियानंतर नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये पोहोचले यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युक्रेनने वेळ न घालवता शांततेबद्दल बोलले पाहिजे. संवादातून तोडगा निघतो. भारत पूर्वीपासूनच रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवून शांततेचे आवाहन करत आहे.

Exit mobile version