चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेत एक मोठे विधान केले आहे. ‘चीनने कोणत्याही देशाची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. तसेच, आम्ही कोणतेही युद्ध सुरू केलेले नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. जिनपिंग हे एशिया-पॅसिफिक आर्थिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांची भेट घेतली. गुरुवारी रात्री भोजन समारंभादरम्यान त्यांनी ही घोषणा दिली.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुमारे एक वर्षानंतर भेट घेतली. अमेरिका आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध बिघडले असताना ही भेट झाल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरात आर्थिक मंदी असून पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. तैवानबाबतही तणावपूर्ण परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांच्या अध्यक्षांची ही भेट झाली.
यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे सीईओ (यूएसआयएसपीएफ) मुकेश अघी यांच्या मते, अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश त्यांचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय दृष्टिकोनातून विचार केल्यास दोन्ही कमकुवत नेते एकत्र आले आहेत. तर, भारताकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात एक सशक्त नेता आहे. या पार्श्वभूमीवर भारत या बैठकीकडे पाहात आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उबाठाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं अतिशय निंदनीय
वसईकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहत्तर समाजाची भूमिका महत्त्वाची!
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री
मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे एशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेची बैठक होत आहे. ही बैठक ११ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत सुरू आहे. याआधी ही परिषद इंडोनेशियातील बाली येथे २४ नोव्हेंबर २०२२ रोजी झाली होती.