कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

चीनच्या भारताच्या सीमेवरील कुरापती अजूनही कमी झालेल्या नाहीत. दरम्यान आता चीनने भारताच्या सीमेवर मोबाईल टॉवर उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लडाखमधील पॅंगॉंग तलावाजवळील पूलाच्या बांधकामानंतर चीनने भारताच्या सीमेवर हे तीन टॉवर उभे केले आहेत.

चुशुल प्रदेशातील एका नगरसेवकाने फोटो पोस्ट करून दावा केला आहे. भारत सीमेच्या अगदी जवळ चीनने तीन मोबाईल टॉवर उभारले असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट करत दिली. लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक कोंचोक स्टँझिन यांनी या  मोबाईल टॉवरचे फोटो ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. माझ्या मतदारसंघातील ११ गावांमध्ये अद्याप ४जी सेवा नाहीत. चीनच्या अशा प्रकारच्या कुरापती हा चिंतेचा विषय नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

चुशुल हे गाव सीमोरेषेपासून ८ किमी पश्चिमेकडे असून गावापासून पूर्व दिशेला सीमा आहे. याअगोदरही चीनच्या अवैध बांधकामाची माहिती लोकसभेत देण्यात आली होती. त्यानंतर चीनने पॅगॉंग तलावाच्या जवळ पूलाचे बांधकाम केलं होतं.

हे ही वाचा:

नवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत

मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू 

चीनच्या कुरापती या सीमाभागात सुरूच असतात. डिसेंबर २०२१ मध्येही चीनने भारताच्या ईशान्येकडील राज्यावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील तब्बल १५ ठिकाणांची नावे बदलली होती. तर जानेवारी २०२२ मध्ये चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले होते. काही दिवसांनी या तरुणाची सुटका चीनने केली होती.

Exit mobile version